भाजपच्या माथ्यावर संविधान आणि आरक्षण संपवण्याचा ‘कलंक’; नाना पटोलेंचे टीकास्र
Nana Patole Criticized BJP Narrative about Constitution : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भीतीने भारतीय जनता पक्षच (BJP) सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण आणि संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड केलीय. फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.
दिल्ली येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भाजपाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने लोकशाही आणि संविधानास धाब्यावर बसवले आहे. आरक्षण संपवणारा पक्ष अशा शिक्काच त्यांच्या माथ्यावर पडलेला आहे. हा कलंक पुसण्याचा भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी त्यात त्यांना यश येणार नाही. 2014 साली रामलीला मैदानावर संविधान जाळण्यात आले. त्यावर भाजपा सरकार आणि मोदी सरकाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय.
प्रलंबित जागावाटपाचा तिढा सुटला, मविआचा नवा फॉर्म्युला समोर…; थोरातांनी क्लिअर केलं
युपीएसच्या परीक्षा न घेताच थेट भरती करून एका विशिष्ट जातीच्या मुला-मुलांची संयुक्त सचिव पदावर भरती करून आरक्षणाच्या लाभापासून गरिबांच्या मुलांना वंचित ठेवण्याचे पाप भाजपने केले आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पहिल्यापासूनच संविधान मानत नाहीत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या जागी मनुस्मृती आणून जनतेला पुन्हा गुलाम बनवण्याचा भाजपा आणि आरएसएसचा कुटील डाव आहे, हे जनतेला माहित असल्याचं पटोले म्हणाले आहेत.
सहा तास थांबून फक्त 40 सेकंद भेटले, जगतापांना उमेदवारी मिळताच महादेव बाबर ठाकरेंवर संतापले
देशाची लोकशाही व्यवस्था आणि संविधान अबाधित रहावे, यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी साडेचार हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढली. त्यानंतर मणिपूर ते मुंबई अशी 7 हजार किलोमिटरची भारत जोडो न्याय यात्रा काढून देश जोडण्याचे तसेच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले आहे. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले आणि आंबेडकर यांचा भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने अवमान केला आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून भाजपाच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असंही नाना पटोले म्हणालेत.