प्रलंबित जागावाटपाचा तिढा सुटला, मविआचा नवा फॉर्म्युला समोर…; थोरातांनी क्लिअर केलं

  • Written By: Published:
प्रलंबित जागावाटपाचा तिढा सुटला, मविआचा नवा फॉर्म्युला समोर…; थोरातांनी क्लिअर केलं

MVA Seat Sharing Formula : दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला निश्तिच केला होता. त्यानंतर मविआचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने 65 उमेदवारांची घोषणा केली. कॉंग्रेसने (Congress) 48 उमदेवरांची जाहीर केले. तर काल शरद पवार गटाने 45 उमेदवार जाहीर केले. आतापर्यंत मविआने 158 उमदेवारांची घोषणा केली. दरम्यान, आता मविआचा नवा फॉर्म्युला समोर आला.

‘दलबदलू’ 4 वेळा निवडून आले, पण इंदापूरचा विकास केला नाही; अजितदादांनी घेतला हर्षवर्धन पाटलांचा समाचार 

प्रलंबित जागावाटपाचा तिढा सुटत नसल्यानं काँग्रेस हायकमांडने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे जागावाटपाची सुत्रे दिली. तसेच राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतलं. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या नवी दिल्लीत आहेत. हायकमांडची राज्यातील या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या चर्चेनंतर थोरातांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी जागावाटपाचा नवा फॉर्म्युला स्पष्ट केला.

ऐन निवडणुकीत पुण्यात 138 कोटीचं सोनं पोलिसांनी पकडले, पुढे काय झालं? 

थोरात म्हणाले की, राज्याची निवडणूक आहे, त्यामुळं काही अडचणी असतात, त्या आम्ही सोडवत असतो. आम्ही आमच्या मित्रपक्षांना 18 जागा दिल्या आहेत. आता प्रमुख तीन घटक पक्षांचा फॉर्म्युला 85-85-85 वरून 90-90-90 वर पोहोचला आहे.
आमचे उमेदवार सक्षम आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आहे. आता आम्ही ही नावं सीईसी पुढे ठेवणार आहोत, असं म्हण महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढत कुठंही करणार नाही, असंही थोरतांनी सांगितलं.

थोरात म्हणाले की, आम्ही 18 जागा मित्रपक्षांसाठी ठेवल्या आहेत. यातून किती सुटतील बघू. काँग्रेस 100 च्या पुढे जाणार का याची अजून बेरीज केली नाही, असं थोरात म्हणाले.

ठाकरे गटाने आतापर्यंत 65 उमेदवारांची घोषणा केली. कॉंग्रेसने 48, तर शरद पवार गटाने 45 उमेदवार जाहीर केले. आता नवा फॉर्म्युला समोर आल्यानंतर उर्वरित जागावाटप कधी होणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं.

नाना पटोले म्हणाले की, सीईसीमध्ये सर्वच जागांवर शिक्कामोर्तब होईल, पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील. आज 55 जागांवर चर्चा झाली, असं पटोले म्हणाले.

संविधान नको, ही भाजपची भूमिका आहे तर काँग्रेसने संविधानाला बळ दिले. देशातील जनतेला कंगाल करणे, त्यांना गुलामगिरीकडे नेणे आणि मनुस्मृतीची अंमलबजावणी करणे हा भाजपचा प्रयत्न आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube