ऐन निवडणुकीत पुण्यात 138 कोटीचं सोनं पोलिसांनी पकडले, पुढे काय झालं?

ऐन निवडणुकीत पुण्यात 138 कोटीचं सोनं पोलिसांनी पकडले, पुढे काय झालं?

138 crore gold seized In Pune : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवार घोषित केले जात असतानाच पुण्यात नाकाबंदीदरम्यान, मोठं धबाड पोलिसांच्या हाती लागलंय. पोलिसांकडून नाकाबंदी सुरु असताना 138 कोटी रुपयांचं सोनं (gold seized) पकडले. ऐन निवडणुकीच्या काळातच मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याने एकच खळबळ उडालीयं.

इंदू आणि फंट्या गँगने सजवला दिवाळीचा किल्ला! ‘इंद्रायणी’ मालिकेत बच्चे कंपनीची मोठी धमाल

पुण्यातील सहकारनगर भागात पोलिसांकडून नाकाबंदी सुरु आहे. अशातच एका टेम्पोमध्ये 138 कोटी रुपयांचं सोनं आढळून आलंय. पोलिसांनी या घटनेची माहिती निवडणूक अधिकारी आणि आयकवर विभागाला दिलीयं.
महायुतीत काडी पडलीच! “मला पैशांची ऑफर अन् धमक्या..” आ. कांदेंचे भुजबळांवर गंभीर आरोप

या प्रकरणी डीसीपी स्मार्तना पाटील यांनी माहिती दिली की, सकाळच्या सुमारास नाकाबंदी सुरु असताना एका टेम्पोमध्ये पांढऱ्या रंगाचे बॉक्स आढळून आले. या बॉक्ससंदर्भात चौकशी केली असता असल्याचं वाहनचालकांकडून सांगण्यात आलं. आयकर विभागाकडून तपासणी सुरु असल्याची माहिती पाटील यांनी दिलीयं. तर चौकाशीत हे डिलिव्हरी ट्रान्सपोर्टचे सोने असल्याचे समोर आले. त्यानंतर चलन तपासणी करून भरारी पथकाने ते सोडून दिले आहे.

स्थावर, जंगम, बॅंक ठेवी अन् शेअर्स; छगन भुजबळांच्या संपत्तीचा आकडा समोर

मागील आठवड्यातच सोलापुरात एका कारमध्ये 5 कोटी रुपयांची रक्कम आढळून आली होती. त्यानंतर कारमध्ये 5 नाही तर 15 कोटी रुपयांची रक्कम असल्याचा आरोप करण्यात आला. ही कार एका आमदाराशी संबंधित असल्याचा चर्चा सुरु झाल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube