‘दलबदलू’ 4 वेळा निवडून आले, पण इंदापूरचा विकास केला नाही; अजितदादांनी घेतला हर्षवर्धन पाटलांचा समाचार

‘दलबदलू’ 4 वेळा निवडून आले,  पण इंदापूरचा विकास केला नाही; अजितदादांनी घेतला हर्षवर्धन पाटलांचा समाचार

NCP Ajit Pawar Criticized Harshvardhan Patil : इंदापूर (Indapur) विधानसभा मतदारसंघात महायुतीने दत्तामामा भरणे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्यासाठी अजित पवार (NCP) यांनी जाहीर प्रचार सभा घेतली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा खरपूस समाचार घेतलाय. इंदापूर मतदारसंघाचे उमेदवार दत्ता भरणे यांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते.

सहा तास थांबून फक्त 40 सेकंद भेटले, जगतापांना उमेदवारी मिळताच महादेव बाबर ठाकरेंवर संतापले

हर्षवर्धन पाटलांनी तीनशे कोटी रूपये आणलेत. त्याचं काय केलं? असा सवाल अजितदादांनी भरसभेत विचारला. आमच्याकडून सगळं गोड गोड बोलून मंजूर करून घेतलं. सोईस्कर आलं अन् गेले निघून असा टोला त्यांनी लगावला आहे. लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो. परंतु यावेळीच अदृश्य काम केलं, असं हर्षवर्धन पाटील कालच्या भाषणात म्हणाले. यावर अजित पवारांनी त्यांना चांगलंच घेरलंय. अजित पवारांनी असं कधीच केलं नाही. समोरून थेट विरोध केलाय, मॅचफिक्सिंग प्रकारचं नाही असं अजित दादा भरसभेत म्हणालेत.

“समोर कुणीही असो जनतेचं ठरलंय..” वडगाव शेरीत बापूसाहेंबानी टिंगरेंना ललकारलं

ही पद्धत आहे, त्यावर कसा विश्वास ठेवायचा असा सवाल अजितदादांनी केलाय. एकीकडे तुम्ही आमच्या सगळ्या खांदानाला घरी नेलं, ओवाळलं. अन् अदृश्य प्रचार केला, अशी टीका पवारांनी केलीय. ही लोकं कोणाचीच नाही. ही लोकं उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी लोकं आहेत, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. टांगा घोड्याची उपमा देत त्यांनी हर्षवर्धन पाटलांवर घणाघात केलाय. त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा ‘दलबदलू’ असा उल्लेख केलाय.

29 वर्षांपासून किती फसवाफसवी कराल? असा सवाल अजित दादांनी केलाय. चार-चार वेळा निवडून जाता. सगळे कारखाने, संस्था अडचणीत आणल्या. सूतगिरणी उभी केली नाही तर शिक्षणसंस्थेची चौकशी सुरू झाली. विकासकामं करावी लागतात. हर्षवर्धन पाटलांनी मागील वीस वर्षात केलेलं काम आणि दत्तामामांनी मागील दहा वर्षात केलेलं काम, यावर अजित पवारांनी भाष्य केलंय. चार वेळा निवडून आले पण इंदापूरचा विकास केला नाही, असा अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचा समाचार घेतलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube