सहा तास थांबून फक्त 40 सेकंद भेटले, जगतापांना उमेदवारी मिळताच महादेव बाबर ठाकरेंवर संतापले

  • Written By: Published:
सहा तास थांबून फक्त 40 सेकंद भेटले, जगतापांना उमेदवारी मिळताच महादेव बाबर ठाकरेंवर संतापले

Mahadev Babar: पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शरद पवार (Sharad Pawar) गटाला सुटला. मात्र, पुण्यातील या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला होता. आता ही जागा शरद पवार गटाकडे गेल्यानं ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवा महादेव बाब (Mahadev Babar) हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहे. दरम्यान, आता त्यांनी ठाकर गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली.

25 वर्षांच्या सोहळ्याला एक दिवस थोडीच पुरणार! झी मराठी अवॉर्ड्स 2024; ‘या’ दिवशी होणार मोठ्ठं सेलिब्रेशन 

काल शरद पवार गटाने प्रशांत जगताप यांना हडपसरमधून तिकीट देण्यात आलं. मात्र, ठाकरे गटाकडून महादेव बाबर हे निवडणूक लढविण्यावर ठाम होते. त्यांनी त्याबाबत उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. याबाबत बोलताना बाबर म्हणाले, हडपसरची जागा ठाकरे गटाला मिळावी म्हणून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आम्ही मातोश्रीवर गेलो होतो. सहा तास थांबलो, मात्र, त्यांनी फक्त 40 सेकंद आम्हाला दिले. त्यात त्यांनी केवळ प्रयत्न सुरू आहेत, असं सांगितलं अन् ते निघून गेले होते, असं बाबर म्हणाले.

यावेळी त्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार केली. पुणे जिल्ह्यासाठी त्यांना महाविकास आघाडीतून एकही जागा मिळवता आली नाही. शिवसेना फक्त मुंबईपुरती मर्यादित राहिली. आम्ही सर्व शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही जन्म पुण्यातच झाला. मात्र, आज पुण्यात एकही जागा आम्हाला मिळत नाही, असं म्हणत बाबर यांनी नाराजी व्यक्त केली.

25 वर्षांच्या सोहळ्याला एक दिवस थोडीच पुरणार! झी मराठी अवॉर्ड्स 2024; ‘या’ दिवशी होणार मोठ्ठं सेलिब्रेशन 

महादेव बाबर बंडखोरी करणार?
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच धडा शिकवणार असं म्हणत बाबर यांनी
आक्रमक पवित्रा घेतला. तिकीट न मिळाल्याने महादेव बाबर यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. केवळ मीच नाही तर संपूर्ण पुणे जिल्हा नाराज आहे. शिवसैनिक नाराज आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही मशालचा उमेदवार दिला नाही, मग शिवसैनिकांना काम कसं करायचं? पुणे जिल्ह्यात मशाल कशी पोहोचवायची? असा सवाल बाबर यांनी केलं.

आम्हाला वाऱ्यावर सोडलं…
पक्षश्रेष्ठींना आमचं देणंघेणं नाही. त्यांनी हजारो शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं. आमची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही लवकरच निर्णय घेऊ. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार नाही. मी आजपासून शिवसेनेचे काम करणार नाही, असं बाबर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube