Download App

2024 चा Congress चा अजेंडा क्लिअर; भाजपला पाडण्यासाठी खर्गेंनी सांगितला ‘हा’ प्लॅन..

Congress : काँग्रेसच्या (Congress) रायपूर येथे सुरू असलेल्यी 85 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या (Congress Session in Raipur) दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांच्या नेतृत्वातील सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसचा अजेंडा काय राहणार याचीही माहिती दिली. ते म्हणाले,की दिल्लीतील सरकारविरोधात लढण्याची वेळ आता आली आहे. ‘सेवा, संघर्ष और बलिदान सबसे पहिले हिंदुस्तान’ ही घोषणा असेल.

आगामी काळात लढणार संघर्ष करणार, बलिदान देणार, सबल व संपन्न राज्याची स्थापना करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. बीजेपी आरएसएस (BJP-RSS) विरोधातील दलांना साथ घेण्याची तयारी राहणार आहे, असे खर्गे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : Congress Session : मल्लिकार्जुन खरगेंकडून मोदी टार्गेट; म्हणाले, देशात लोकशाही आणि संविधान..

ते पुढे म्हणाले, की सेवा, संघर्ष और बलिदान सबसे पहला हिंदुस्तान ही घोषणा असेल. कारण, भाजपा सत्तेच्या स्वार्थासाठी संस्थांना धक्का देत आहे. युवकांचे भविष्य अंधारात टाकत आहेत. नोटबंदी व जीएसटीमुळे (GST) छोटे उद्योग उद्धवस्त झाले आहेत. पिकाला भाव न दिल्यामुळे शेतकरी उद्धस्त केले. ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून सरकार पाडण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Congress नेते Pawan Khera यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक, ही तर तानाशाही काँग्रेसची टीका

बीजेपी सरकारने छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला. येथेही छापा मारला. तरीसुद्धा येथील मुख्यमंत्री व कार्यकर्त्यांनी संघर्ष करत आधिवेशन सफल केले. नोटबंदीमुळे दोन कोटी लोकांचे रोजगार गेले. चुकीच्या जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे धंदे गेले. लॉकडाऊनमुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले. 12 कोटी बरोजगार झाले तर 23 कोटी लोक दारिद्र्यात ढकलले गेले. तरी सत्ताधारी त्यांची पाठ थोपटत आहेत हे विशेष.

मोदींच्या मित्राची एका दिवसाची कमाई हजार कोटी
देशातील एका नागरिकाचे उत्पन्न 27 रुपये तर मोदींच्या मित्राची दिवसाची कमाई एक हजार कोटी रुपये आहे. दिल्लीचे प्रधानसेवक त्यांच्या मित्राची सेवा करत आहेत. देशातील संपत्ती मित्रांच्या हवाली करत आहेत. सगळेच विकून टाकण्याचे काम केले जात आहे. एलआयसी व स्टेट बँक तरी वाचणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशात भेदभावही वाढला आहे. मजूर आत्महत्या करण्यास भाग पडत आहेत तर दुसरीकडे मनरेगाचे बजेट 90 हजार कोटींवरून 30 हजार कोटींवर आणले गेले. हे यांचे गरीबांप्रती काम आहे. मनरेगासाठी 1 लाख 75 हजार कोटींची गरज आहे. या योजनेसाठी पण यांनी फक्त 30 हजार कोटींचीच तरतूद केली आहे. दलित आदिवसींवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. पण काहीच कारवाई होत नाही. मते घेण्यासाठी वंचितांच्या हिताच्या गप्पा मारतात. त्यामुळे आता संघर्ष करावाच लागणार आहे, असा इशारा देत त्यांचा डीएनएच गरीब विरोधी असल्याचा आरोप खर्गे यांनी केला.

56 इंचाची छाती कुठे ?

चीनसमोर यांनी गुडघे टेकले आहेत. हे सरकारचे अपयश आहे. देशाला वाचविण्यासाठी लोकशाही संरक्षणासाठी आम्ही लढत आहोत. चीनने 2020 पासून जमिनीवर कब्जा केला तरी मोदींनी चीनला क्लिनचीट का दिली, याचे उत्तर द्या. चीनकडून जमीन पुन्हा मिळवा, एप्रिल 2020 पर्यंत जी स्थिती होती ती परत आणा तरच आम्ही मानू, 56 इंच छाती.

 

 

Tags

follow us