Congress नेते Pawan Khera यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक, ही तर तानाशाही काँग्रेसची टीका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (70)

काँग्रेस (Congress )  पक्षाचे ज्येष्ठ नेते पवन खेरा ( Pawan Khera )  यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरुन ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे उद्यापासून रायपूर येथे अधिवेशन होते. त्यासाठी काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील सर्व नेते मंडळी विमानाने रायपूरला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी दिल्ली पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले आहे.

काँग्रेसचे नेते इंडिगो (6E-204) विमानातून रायपूरला चालले होते. यावेळी दिल्ली पोलिसांना त्यांना विमानातून उतरवले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याने ते प्रवास करु शकत नाही, असे पोलिासांनी त्यांना सांगितले. आसाम पोलिसांच्या शिफारसीनंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतले आहे, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

यावेळी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी विमानतळावर भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. काँग्रेसचे नेते विमानतळावरच आंदोलन करत बसले आहेत. त्यांनी या कृत्याला सरकारची तानाशाही असे म्हटले आहे. आमच्या रायपूरच्या अधिवेशनात बाधा निर्माण व्हावी, यासाठी ही अटक केल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

Tags

follow us