Mahrashtra Congress : महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात दोन मोठे भूकंप झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाची ताकद एकदम कमी झाली आहे. पक्ष वाढीसाठी ठाकरे, पवार यांना जोरदार कष्ट करावे लागणार आहेत. या दोन पक्ष फुटीचा फायदा आता काँग्रेस (Congress) उठविणार हे बोलले जात होते. त्याच दृष्टीने काँग्रेसने आता तयारी सुरू केली आहे. (congress will plot the split of shivsena nationalists congress)
राज्यातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेसची घट्ट पकड कशी मिळविता येईल, लोकसभा, विधानसभ निवडणुकीची रणनितीबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे भविष्यातील मनसुबे सांगून टाकले आहे.
पक्ष फुटीनंतर अजितदादा गटाला नडणाऱ्या खासदार कोल्हेंवर पवारांनी सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
अशोक चव्हाण म्हणाले, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर राज्यात काँग्रेस वाढविण्यासाठी चांगली संधी आहे. ही राजकीय पोकळी भरून काढली जाईल. महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी नवी संधी आहे. त्याचा फायदा उठविला जाईल. त्यामुळे काँग्रेस सध्या इलेक्शन मोडमध्ये आहे. त्यामुळे लोकसभेसाठी आम्ही चांगल्या जागा लढवून यश मिळवू, असा विश्वासही चव्हाण यांनी बोलून दाखविला आहे. तर महाविकास आघाडीबाबत सकारात्मक असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका, लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेस ताकद वाढविण्यासाठी संधी वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये एकीकाळी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेला काँग्रेस आता लोकसभा व विधानसभेच्या जास्त जागा मागणार हे दिल्लीतील बैठकीतूनच स्पष्ट होत आहे.
भुजबळांना सिध्दगड, वळसेंना सुवर्णगड; मंत्र्यांना बंगले वाटप, कोणाला कोणता बंगला मिळाला?
विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद होते. परंतु ते आता सत्तेत सहभागी झाले आहेत. फुटीमुळे शरद पवार गटाकडे कमी आमदार आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचे नेते दावा सांगत आहे. विरोधी पक्षनेतेपदावर बैठकीत चर्चा झालेली नाही. त्याबाबत पक्ष निर्णय घेणार आहे. त्यावर मी आताच बोलणार नाही, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.