पक्ष फुटीनंतर अजितदादा गटाला नडणाऱ्या खासदार कोल्हेंवर पवारांनी सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

पक्ष फुटीनंतर अजितदादा गटाला नडणाऱ्या खासदार कोल्हेंवर पवारांनी सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

अजित पवार हे नऊ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी पक्षावर आणि चिन्हावरच दावा ठोकला. त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष संकटात सापला. अनेक विश्वासू-साथीदार अजित पवारांसोबत गेले. त्यामुळं पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी शरद पवारांनी राज्याव्यापी दौर सुरू केला. शिवाय, आता पक्षफुटीनंतर पक्षातही अनेक बदल करण्यात येते आहेत. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्यानंतर आता खासदार अमोल कोल्हेंची (Dr. Amol Kolhe) नियुक्ती करण्यात आली. (MP Dr Amol Kolhe appointed campaign chief NCP)

https://www.youtube.com/watch?v=I2f9gQrbQD0

राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची पक्षाचे राष्ट्रीय शरदचंद्र पवार साहेब संमतीने आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खासदार अमोल कोल्हे यांना सदर नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी सुप्रिया सुळे, कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, पालघर जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस आदिती नलावडे , प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे , मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव , प्रदेश युवक अध्यक्ष महेबुब शेख , विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे , युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले हे उपस्थित होते, असं ट्विट राष्ट्रवादीनं केलं.

दरम्यान, अमोल कोल्हे यांची प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांनी टि्ट करत आभार मानले. त्यांनी लिहिलं की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली. माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब, महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो! आपण सर्वांनी दाखविलेला हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल!

ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार, 28 टक्के जीएसटी लागणार… 

अजित पवारांसह 9 मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार हजर होते. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही सहभाग होता. त्यामुळे कोल्हेंविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पण दुसऱ्याद दिवशी त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन आपण शरद पवारांसोबत असल्याचं जाहिर केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी येवल्याच्या सभेत शरद पवार यांनीही डॉ. कोल्हे यांना विशेष वागणूक दिली होती. अमोल कोल्हे हे पवारांच्या गाडीत फ्रंटसिट बसलेले दिसले होते.

दरम्यान, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडत असतांना अमोल कोल्हे यांनी ‘शिवस्वराज्य यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यामुळं भाजपची पिसे गळाली होती. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीवरील संकट उलथवून टाण्यासाठी राष्ट्रवादीनी त्यांची पचारप्रमुखपदी निवड केली. त्यामुळे ही जबाबदारी अमोल कोल्हे कसे पेलतात, हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube