Download App

महायुतीमध्ये इनकमिंग सुरूच! आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागले कॉंग्रेसचे दोन बडे नेते?

Congressचे दोन बडे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कोण आहेत हे दोन नेते पाहूयात...

Congress’s Bhaskar Khatgaonkar and Minal Khatgaonkar will be in Ajit Pawar’s NCP : भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या महायुतीने लोकसभा निवडणुकीतून धडा घेत विधानसभेमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर आता महविकास आघाडीला वारंवार खिंडार पडत आहे. कधी कॉंग्रस तर कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेते महायुतीतील पक्षांमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्यात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला कॉंग्रेसचे दोन बडे नेते लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कोण आहेत हे दोन नेते पाहूयात…

भाषा वाद विकोपाला! तामिळनाडूने बजेटमध्ये हटवलं रुपयाचं चिन्ह, कारणही धक्कादायक

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला कॉंग्रेसचे दोन बडे नेते लागल्याने कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यामध्ये ज्या दोन नावांची चर्चा आहे. त्यात भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे आणि कॉंग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर तसेच त्यांच्या सुनबाई मीनल खतगावकर या देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

DMK नेत्याच्या मुलानेच बनवलं होतं रुपयाचं चिन्ह; तामिळनाडू सरकारने का हटवलं?

भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांनी नुकतीचं झालेली विधानसभेची निवडणुक नायगाव विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकीटावर लढवली होती. मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे खतगावकर कुटुंब अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सध्या राज्यात महाविकास आघातील अनेक नेते आणि कार्यकर्ते हे महायुतीची वाट धरत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महायुतीमध्ये इनकमिंग सुरूच असल्याचं चित्र आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी पिढ्यान् पिढ्या कॉंग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना खासदारकीही मिळाली. तर आता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांचे मेहुणे आणि कॉंग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर तसेच त्यांच्या सुनबाई मीनल खतगावकर या देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लवकरच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार एवढं नक्की.

follow us