Download App

‘तू नागपूरला ये, नाहीतर मी बारामतीत येतो…’; कॉंग्रेस नेत्याचं अजितदादांना चॅलेंज

अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं. त्यावर आता कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं.

Sunil Kedar on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांना मंत्रीपद देण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) अशोक पवारांना थेट चॅलेंज दिलं होतं. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो, तेच पाहतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं. त्यावर आता कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं.

चंद्रकांत पाटलांना काय कळतं? फक्त तेरे नाम भांग पाडून फिरतात…; जरागेंचा हल्लाबोल 

केदार सध्या पुण्यात कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले आहेत .त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अजित पवारांच्या दमबाजीविषयी विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात काही होऊ द्यायचे नाही आणि फक्त गप्पा मारायच्या. तुला पाहतो, तू कसा निवडून येतो, असा दम द्यायचा. नागपुरात ये, कसा निवडून येतो, ते मी सांगतो. नागपूरला ये नाहीतर मी बारामतीमध्ये येतो. लोकशाहीत लोकांची कॉलर पकडून मतं मागायचे नसते. लोकांच्या मनात जिव्हाळा आणि विश्वास निर्माण करायचा असतो, असं केदार म्हणाले.

भुजबळांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे…; गोपीचंद पडळकरांचं मोठं विधान 

हा प्रकार योग्य नाही. ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी लोकशाही समजून घेतली पाहिजे. आमदार जनतेतून निवडून येतात. विधानसभा निवडणूका येऊ द्या, बारामतीत कळेल त्यांना, असंही केदार म्हणाले.

संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलत असतांना बाळासाहेब थोरातांनीही अजित पवारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, अजित पवारांना आपण धाडसी आहोत हे दाखविण्याच्या अनेक संधी होत्या. मात्र, त्यांनी त्या गमावल्या. अजित पवार हे राज्यातील तगडी आसामी आहेत. मात्र त्यांनी पोरांसोरांना दमबाजी करणं सुरू केलं, दमबाजी करून काहीही होणार नाही, असं थोरात म्हणाले.

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलतांना अजित पवार यांनी आमदार अशोक पवारांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, दिलीपराव वळसे पाटलांचा शपथ विधी झाली की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. आता पुढच्या वेळी तू मंत्री होणार, असे साहेबांनी त्याला सांगितले. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो, तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं.

follow us

वेब स्टोरीज