वळसे पाटलांचं शपथविधीला नाव घेताच गडी बिथरला; अजितदादांनी अशोक पवारांना धुतलं
Ajit Pawar On Amol Kolhe : शपथविधीला दिलीप वळसे पाटलांचं (Dilip Walse Patil) नाव घेताच गडी बिथरला असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांना धुतलं. शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा उरळी कांचनमध्ये पार पडली. यावेळी अजित पवार बोलत होते.
अजित पवार हे पवारांचे राजकीय वारसदार आहेत की नाही, याचा निकाल बारामतीकर घेणार
अजित पवार म्हणाले, मी कामाचा माणूस आहे, मला उगीचच गप्पा मारायला आवडत नाही . उगीच कोणाला तरी बरं वाटावं म्हणून मी बोलत नाही. अशोक पवारांसह इतर सर्वच आमदार माझ्यासोबत चर्चा करीत होते. त्यावेळी सर्वच आमदारांनी खूप चांगला निर्णय असल्याचं म्हणत माझं कौतूक केलं होतं. अशोक पवारांनी अॅफिडिव्हीटवर सही केली, आमच्यासोबतही आले मात्र, शपथविधीला दिलीप वळसे पाटलांचं नाव घेताच गडी बिथरला. दिलीप वळसेंना घेतलेलं मला आवडणार नाही, असं पवार म्हणाले होते, पण तूला मी निवडून आणलंय अन् तू अशा गप्पा मारतो, या शब्दांत अजित पवार यांनी धुतलं.
दुष्काळमुक्त नगरसाठी मंत्री विखे सरसारवले; भर सभेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं
तसेच दिलीप वळसेंचं नाव घेताच अशोक पवार म्हणाले, अजित पवार यांनी शपथ घ्यायला नको होती. शरद पवारसाहेबांसाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण त्याची सगळी अंडीपिल्ली मला माहितीये, या शब्दांत अजित पवार यांनी धुतलं आहे.
मुंबई हल्ल्यावरील विधान वडेट्टीवारांच्या अंगलट येणार; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
शिरुरच्या उमेदवाराला खासदारकीमध्ये नाही तर अभिनयात रस :
अमोल कोल्हे यांना मीच खासदार केलं आहे, त्यांनी फक्त निवडणुकीचा अर्ज भरला होता. त्यानंतर प्रचारासह सर्वच गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. निवडून आल्यानंतर दोन वर्षांनतर कोल्हे माझ्याकडे राजीनामा घेऊन आले होते. त्यावर आम्ही सर्व जणांनी त्यांना कसंबसं समजावून सांगितलं होतं. त्यांच्या या निर्णयामुळे शरद पवार मलाच बोलत होतं. शिरुरच्या त्या उमेदवाराला खासदारकीमध्ये नाही तर अभिनयात रस असल्याची टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केलीयं.