Eknath Shinde : शरद पवारांनी काय दिवे लावले, अशोक चव्हाणांनी शेण खाल्लं म्हणायचा… आता तुम्ही काय खाताय मग?
रत्नागिरी (खेड) : कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी काय दिवे लावले. मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी शेण खाल्ले असे २०१९ पूर्वी उद्धव ठाकरे म्हणायचे. मग मी आता विचारतो की महाविकास आघाडीत जाऊन तुम्ही काय खाल्ले आणि आता काय खाताय, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार मैदानावर ५ मार्चला सभा घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदार तसेच भाजपवर साडकून टीका केली होती. तेव्हाच शिंदे गटाच्या वतीने आम्ही १९ मार्चला याच मैदानात सभा घेऊन उत्तर देऊ, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आजच्या सभेत गोळीबार मैदानातून मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार, कोणावर फायरिंग करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
Eknath Shinde : आधीचं सरकार ‘सायलेंट’, आताचे ‘अलर्ट’ मोडवर!… कोकणासाठी केल्या तीन महत्वपूर्ण घोषणा!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सत्तेचा मोह झाला पडली आणि तुम्ही बदलून गेलात. चला ठीक आहे. पण अनेक विषय आले, सेक्युलरचा विषय आला, सावरकरांचा विषय आला, तेव्हा तुम्ही भूमिका बदलायला लागला. पण तुम्ही जेव्हा गप्प बसायला लागला. तुम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायला देखील कमी पणा वाटू लागला. तेव्हा आम्ही पाहिलं की सोनिया गांधी काँग्रेसच्या बद्दल तुमचं काय मत होतं, तेव्हा शरद पवार हे कृषिमंत्री होते. तेव्हा तुम्हीच म्हणाला होता कृषिमंत्री म्हणून यांनी काय दिवे लावले.
मग २०२९च्या निवडणुकीनंतर काय दिवे लागले आहे. तर तुमच्या डोक्यामध्ये त्यांनी सत्तेचा मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला आणि सगळेच बिघडलं. सगळे वाईट होते ते चांगले झाले. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना तुम्हीच म्हणाला की त्यांनी शेण खाल्लं. हे सर्व तुमचेच शब्द आहेत. मग आता तुम्ही त्यांच्या पंक्तीमध्ये बसून तुम्ही काय खाताय, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.