‘कचा-कच बटना’वरुन नवा वाद; ‘अजित पवार व्यापारीच’ विरोधक बरसताच दादांचं स्पष्टीकरण, म्हणाले..

‘कचा-कच बटना’वरुन नवा वाद; ‘अजित पवार व्यापारीच’ विरोधक बरसताच दादांचं स्पष्टीकरण, म्हणाले..

Ajit Pawar News : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून राज्यभरात जाहीर सभांचा धडाका सुरु आहे. अशातच बारामतीत काल अजित पवार गटाची सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawawr) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन विरोधक अजितदादांवर बरसत आहेत. विरोधकांकडून टीका होताच अजित पवार यांनी आपल्या वादग्रस्त विधानावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. मी जनतेला आवाहन करीत असल्याचं म्हणत अजित पवार यांनी आता सारवा-सारव केल्याचं दिसून आलं आहे.

‘मैदान’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘BMCM’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या आठवड्यात किती झाली कमाई

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजितदादांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडत आहेत. काल बारामतीमधील आयोजित सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, लागेल तेवढा निधी देण्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण जसा निधी हवा. तसेच आमच्यासाठी कचाकचा बटणंही दाबा. म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल. असं वादग्रस्त वक्तव्य अजित पवार यांनी मतदार संघासाठी निधी देण्याबाबत केलं होतं.

Ramayana : रणबीरच्या ‘रामायण’बाबत 3 मोठी अपडेट समोर; एक नव्हे तीन भागांत…

अजितदादांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांच्या या विधानावरुन टीका करण्याची संधी सोडली नाही. अजित पवार हे स्वत: एक व्यापारी आहेत, त्यामुळे ते निवडणुकीमध्ये सौदाच करीत आहेत. देशाला आणि राज्याला सध्या व्यापारीच चालवत आहेत. सत्ताधाऱ्यांनी देशात आणि राज्यात व्यापारांचे एजंट तयार केले असल्याची टीका संजय राऊतांनी केली होती.

मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हा, कंटेट क्रिएटरर्सना पुनीत बालन यांचे आवाहन

मतदार राजाच, ऐकायचं की नाही त्याचा अधिकार :
मी माझ्या भाषणामध्ये जनतेला आवाहन केलं आहे. माझं ऐकायचं की नाही हा मतदार राजाचा अधिकार आहे. त्याला आम्ही काहीही करु शकत नाही. विरोधक उगीचच वेगळ्या उपमा देऊन टीका करीत आहेत. निवडणूक काळात आम्ही हे करु ते करु असं सरकार सांगत असतं. मागील काही दिवसांत आम्ही एक गोष्टी केली ती जनतेला माहिती होती त्याचंच उदाहरण आम्ही दिलं बाकी काही नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी वादग्रस्त विधानावर दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube