‘मैदान’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘BMCM’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या आठवड्यात किती झाली कमाई

‘मैदान’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘BMCM’ला अधिक पसंती, वाचा पहिल्या आठवड्यात किती झाली कमाई

Maidaan VS BMCM BO DAY 6: दर आठवड्याला नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतात. चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी किंवा आठवडाभरात हे चित्रपट किती व्यवसाय करतील याचा अंदाज प्रेक्षक लावत असतात. अशातच आता ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला अजय देवगणचा (Ajay Devgan) चित्रपट मैदान (Maidaan )आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँ (Bade Miyan Chhote Miyan) यांच्या कमाईच्या आकडेवारीवर सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, दोन्ही चित्रपटांच्या सहाव्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.

दोन्ही चित्रपट कमाईच्या बाबतीत काही विशेष कामगिरी करताना दिसत नाहीत. अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँचे’ कलेक्शन अजयच्या मैदानापेक्षा सरस असले तरी. पण बजेटवर नजर टाकली तर अजयच्या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये आहे आणि अक्षयच्या बडे मियाँ छोटे मियाँचे बजेट जवळपास 350 कोटी रुपये झाले आहे. म्हणजे अजयच्या चित्रपटाच्या दुप्पट बजेटमध्ये अक्षयच्या सिनेमाने जमा केला आहे.

अक्षय-टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँची कमाई’

‘बडे मियाँ छोटे मियाँच्या कमाईचा आज 7 वा दिवस आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाचे सहाव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. SACNILC च्या ताज्या अहवालानुसार, चित्रपटाने 2.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाला चांगली कमाई करणे कठीण होत आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन 45.55 कोटींवर पोहोचले आहे. म्हणजेच अक्षयचा चित्रपट 6 दिवसांत 50 कोटींचीही कमाई करू शकलेला नाही.

प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या Anil Kapoor च्या ‘1942: अ लव्ह स्टोरी’ ला 30 वर्षे पूर्ण

अजयच्या मैदानचा सहाव्या दिवसाचा गल्ला किती?

अजय देवगणचा चित्रपट सुरुवातीपासूनच कमाईच्या बाबतीत संथ दिसत आहे. या चित्रपटाच्या कमाईत फारशी वाढ झालेली नाही. मंगळवारी मैदानाची अवस्था आणखीनच बिकट दिसून आली. अजयच्या चित्रपटाने 1.65 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर आता एकूण गल्ला 25.15 कोटी रुपये झाल्याचे दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube