नाव बदलून मिळवली प्रसिद्धी! तुम्हाला ‘या’ फिल्म स्टार्सची खरी नावं माहित आहेत का?
Bollywood Stars Who Changed Their Names For Movies : नाव ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. सर्वजण एका विशेष नावाने आपल्याला हाक मारत असतात. बॉलीवूडमध्ये नावं बदलण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय स्टार्सने (Ajay Devgn) त्यांची नावे बदलली आहेत. आपण आज अशा बॉलीवूड कलाकारांबद्दल (Bollywood News) जाणून घेवू या, ज्यांनी आपली नावं बदलली आहेत.
बारामतीत उमेदवारी फक्त ‘पवार कुटुंबा’तच का? अजित पवारांचा भरसभेत सवाल
अजय देवगण
बॉलिवूडमध्ये नाव बदलण्याची परंपरा खूप जुनी आहे. रुपेरी पडद्यावर यश मिळवण्यासाठी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री वेगवेगळ्या कारणांसाठी आपली नावे बदलत आहेत. आजच्या काळात या सिनेतारकांची प्रगती पाहता नाव बदलण्याचा फायदा त्यांना झाला असे म्हणता येईल. सिंघम फेम अभिनेता अजय देवगणचे खरे नाव विशाल वीरू देवगण होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अंकशास्त्रावर विश्वास ठेवतो. यामुळेच चित्रपटाच्या पडद्यावर पदार्पण करण्यापूर्वी त्याने आपलं नाव बदलून अजय देवगण असं ठेवलं. नाव बदलल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले.
सनी देओल
अभिनेता सनी देओल चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. या नावाने तो जगभर ओळखला जातो, पण गदर फेम अभिनेत्याचं खरं नाव अजय सिंग देओल आहे. लहानपणी त्यांना फक्त सनी म्हणत. हेच कारण होते, जेव्हा त्याने 1983 मध्ये बेताब या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली, तेव्हा त्याने आपले नाव बदलून सनी देओल ठेवले.
“गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका”, अजितदादांची बारामतीकरांना कळकळीची विनंती
अक्षय कुमार
अक्षय कुमारचे नाव बदलण्याशी संबंधित कथा 1987 मध्ये आलेल्या ‘आज’ या चित्रपटाशी संबंधित आहे. या सिनेमात राज बब्बर, स्मिता पाटील आणि राज गौरव यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. खिलाडी कुमारनेही याच चित्रपटात छोटी भूमिका केली होती. अभिनेत्याला कुमार गौरवच्या पात्राचे नाव अक्षय आवडलं. यानंतर त्याने आपलं नाव बदलून अक्षय कुमार ठेवलं होतं. तसं अक्षय कुमारचं खरं नाव राजीव हरिओम भाटिया आहे.
कियारा
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने सलमान खानच्या सांगण्यावरून नाव बदललं. तिने 2014 साली फुगली या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यावेळी आलिया भट्टने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. कियाराचं खरं नाव आलिया होतं. याच कारणामुळे तिनं नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, इन्स्टाग्रामवर तिचं युजर नेम अजूनही कियारा आलिया अडवाणी आहे.