मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केला होता. दरम्यान, यासंदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी खळबळजनक दावा केला आहे की, देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवार यांनी रचला असल्याचे मोठा गौप्यस्फोट गुणरत्न सदावर्तेंनी यावेळी केला आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्या तोंडून काल ‘कट’ असा एक शब्द निघाला. या शब्दाचा मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मला अटक करण्यात आली. या अटकेनंतर खूप करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पोलिसांना माहिती होतं की मी कोर्टात युक्तीवाद करत होतो. मात्र, त्यांच्या डोक्यात वेगळंच शिजत होतं. अटकेनंतर ते माझ्या लक्षात आलं, अशी प्रतिक्रिया अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.
आरोपी हा गुन्हा करतो. मात्र, एकतरी पुरावा सोडून जात असतो. गावदेवी पोलीस ठाण्यातील एक हार्डडिस्क आहे, ती एकदोन दिवसांची नाही, तर त्यात २ वर्षांचं रेकॉर्डींग आहे. ती आणा, कोल्हापुरातील फुटेज आणा, यामधून हा कट कशाप्रकारे रचण्यात आला होता, हे आपल्या लक्षात येणार, असेही ते यावेळी म्हणाले. या सर्वामागे मास्टरमांईड शरद पवारच आहेत, असा आरोप त्यांनी केला.
नागपूर, आरएसएस, राईटविंग आणि देवेंद्र फडणवीसांची भेट याच मुद्द्यांभोवती तपास फिरवला जात होता. एसटी आंदोलकांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता, त्यावेळी त्यांना चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. डीसीपी निलोत्पल यांनी रात्री बोलावून माझ्याशी पवारांच्या हल्ल्यासंदर्भात चर्चा कमी तर नागपूर RSS आणि फडणवीस यांच्या भेटीगाठीसंदर्भात प्रश्न विचारले जात होते, काही देखील करून त्यांना माझ्या तोंडवून वेगळंच काही वदवून घेण्याचा प्रयत्न सुरु होतं, त्यासाठी हा कट रचला गेला होता, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला.