Download App

कमी कपड्यांमध्ये मुली शूर्पणखासारख्या दिसतात, भाजप नेत्याचे पुन्हा वादग्रस्त विधान

Kailash Vijayvargiya’s controversial statement : भाजप नेते कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचा हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कैलाश विजयवर्गीय सांगत आहेत की, काही महिला असे कपडे घालून बाहेर पडतात की गाडीतून खाली उतरून त्यांच्या तोंडात मारावी वाटते. त्या शूर्पणखासारखा दिसतात.

या व्हिडीओमध्ये कैलास विजयवर्गीय म्हणतात, ‘मी कधी कधी बघतो, ‘आजही जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा मला सुशिक्षित तरुण-तरुणी नाचताना दिसतात, त्यांची नशा उतरवण्यासाठी मला खरचं पाच-सात तोंडात माराव्या वाटतात. मी खरे सांगतो, देवाची शपथ. हनुमान जयंतीला मी खोटं बोलणार नाही.

पुन्हा अवकाळीचे संकट, महाराष्ट्र-कर्नाटकसह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

आपण स्त्रियांना देवी म्हणतो पण मुली असे घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात त्यांच्यात देवीचे रूप दिसत नाही. एकदम त्या शूर्पणखासारखा वाटतात. खरचं देवाने एवढं सुंदर शरीर दिलेले आहे छान कपडे घाला यार. तुम्ही मुलांमध्ये संस्कार रुजवा. मला या सर्व प्रकाराची खूप काळजी वाटते.’ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी मुलींच्या आणि महिलांच्या पेहरावाच्या संदर्भात दिलेल्या वक्तव्यामुळे देशातील राजकारण पुन्हा एकदा तापू शकते. काँग्रेसही भाजपला घेरण्याचा प्रयत्न करू शकते.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षात पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भूमिका संशयास्पद असल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले होते. विजयवर्गीय यांनी असा दावा केला होता की ममता बॅनर्जी यांना स्वतःच्या राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा होता जेणेकरून त्यांना त्याचा राजकीय फायदा घेता येईल. पश्चिम बंगालमध्ये रामनवमी किंवा हनुमान जयंतीच्या मिरवणुकांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांना राज्य सरकारच ‘संरक्षण’ देत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Tags

follow us