Navneet Rana : काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं; राणा ‘हे’ काय बोलल्या?

काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं, असं वादग्रस्त विधान महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केलं आहे.

_LetsUpp (6)

navneet rana

Navneet Rana : काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं, असं वादग्रस्त विधान अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलंय. झहिराबात मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बी.बी. पाटील यांच्या प्रचारार्थ राणा सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नवनीत राणा म्हणाल्या, बी.बी. पाटील यांनी मागील पाच वर्षांत झहिराबाद मतदारसंघात केलेली कामे मी पाहिलं आहे. भाजपच्या चारशे पारच्या नाऱ्यामध्ये 400 पैकी झहिराबाद ही एक जागा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजेत. काँग्रेसला मत देणं म्हणजे पाकिस्तानला मत देणं, हाच विरोध करण्यासाठी आज मी तेलंगणात आले असल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं.

नगरकरांमध्ये निवडणुकीचा निकाल फिरवण्याची ताकद; मोदींच्या सभेतील गर्दीने लंकेंना टेन्शन

मुस्लिमाना आम्ही संपूर्ण आरक्षण देणार आहोत, असं लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. ते संपूर्ण आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत, पण मोदी संविधान वाचवण्याची भाषा करीत आहेत. लालूप्रसाद यादवसारखे लोकं संविधान संपवायला निघालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपतीपदासाठी संधी दिलीयं. त्यामुळे मोदींनीच एससी, एसटी समुदायाला संधी दिली असल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलंय.

मोठी बातमी : मतदानाच्या धामधुमीत काटेवाडीत पॉलिटिकल ड्रामा; सुप्रिया सुळे अजितदादांच्या भेटीला

दरम्यान, देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असतानाच भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हे वादग्रस्त विधान केल्याने नवा वाद उफाळून येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version