बीड : दोन दिवसांपूर्वी ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना जबर मारहाण झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर फडतूस गृहमंत्री अशा शब्दात टीका केली होती. त्यानंतर राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर अनेक प्रतिक्रिया येत असून आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळं व्यथित होणार नाहीत. ते त्यांचं काम चांगल्या पध्दतीने करत आहे. माझ्यावर तर दारूवाली बाई म्हणून विरोधकांनी टीका केली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
आज भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, राजकाकारण हा काटेरी रस्ता असून राजकारणात मिळालेलं सत्तेचं सिंहासन हे देखील काट्यांचं असतं. राजकारणातला मुकूट हा देखील काटेरी असतो. राजकारण म्हटलं की टीका-टिप्पण ही होणारच आहे. कधी कधी टीका अत्यंत खालच्या भाषेत केली जाते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका झाली. मात्र, मला खात्री आहे की, त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळं देवेंद्र फडणवीस हे व्यथित होणार नाहीत. ते डिस्टर्ब होणार नाहीत. ते त्यांच काम अतिशय चांगल्या पध्दतीने करत आहेत. आणि यापुढेही ते आपलं काम अशाच पद्धतीने करत राहतील, असं त्या म्हणाल्या.
…म्हणून अमृतपालच्या वकिलाला उच्च न्यायालयाने फटकारलं!
मुंडे यांनी सांगितलं की, माझ्यावर देखील विरोधकांनी अनेकदा टीका केली. अतिशय खालच्या पातळीची टीका माझ्यावर झाली. माझ्या डिस्टिलरी प्लॅन्ट आहे. त्यामुळं काहींनी तर माझ्यावर दारूवाली बाई, अशी टाकी केला. माझ्यावर भ्रष्टाचाराचे देखील आरोप झाले. मला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. इतकचं नाही तर अगदी रेल्वेस्टेशनवरही माझे पोस्टर लावण्यात आले होते. माझे फोटो लावून काही पाकिटे वाटली. माझा अपमान करण्यात आला. राजकारण म्हटलं की, फुलंच वाट्याला येतील, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. राजकारणात केवळ फुलेच वाट्याला येणार नाही. तर अनेकदा टीकेचंही धनी व्हावं लागतं.
बीडशहरात आज सावरकरांची गौरव यात्रा काढण्यात आली. याविषयी बोलतांना मुंडे यांनी सांगितलं की, राहुल गांधी आणि अन्य कॉंग्रेसस्नेहींकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अवमान केला जातो. त्याला उत्तर देण्यासाठी माझ्या सुचनेनुसार,आज परळीत भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं गौरव यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली.