Download App

संजय राऊत यांनी पुन्हा राहुल कुल यांचे नाव घेतले…

  • Written By: Last Updated:

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल कुल (Rahul Kul यांनी केलेल्या 500 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. मात्र, अद्याप गृहमंत्रालयाने याबाबत कोणतेही कारवाई केली. त्यामुळं संजय राऊत पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार मोठा आरोप केला. शिंदे-फडणवीस सरकार सूडभावनेनं काम करत आहे. दादा भुसे, राहुल कुल, किरिट सोमय्यां यांच्यावर कधी कारवाया होणार? असा सवाल करत हे सरकार गुंडाना पाठीशी घालत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

राज्यात ईडीच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना नाकीनऊ आणले आहेत. ईडीच्या कारवाईवरून महाविकास आघाडी आणि भापजमध्ये कलगितुरा आहे. यावरून आता महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना राहुल दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्या संदर्भात त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ईडी, सीबीआय यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. मात्र, गृहमंत्रालय आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून अद्याप याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळं आज राऊत यांनी राज्य सरकारचे गृहखाते आणि केंद्रिय तपास यंत्रणांवर तोफ डागली. राऊत म्हणाले की, विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई होते. मात्र, राहुल कुल आणि दादा भुसेवर कारवाई का केली नाही. ईडी-सीबीआय राजकीय विरोधकांच्या बाबतीच चुकीचा वापर केला जातो, ही आमच्या भूमिका आहे. भाजपच्या वाशिंग मशिनमध्ये टाकलेल्या लोकांवर कारवाई का होत नाही. मी गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्री, सीबीआय आणि ईडीकेड 500 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत, तरी कारवाई होत नाही, असा सवाल त्यांनी केला.

सरकारने ऑनलाइन गेमिंगसाठी केले नवीन नियम जारी, ‘या’ अ‍ॅपवर लवकरच भारतात बंदी 

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाचा हवाला देत ते म्हणाले की, गृहखात्यांकडून विरोधकांना टार्गेट केलं जातं. मात्र, मारहाण करणाऱ्यांवर पोलिस खाते कुठलीही कारवाई करत नाही. उलट तक्रारकर्त्यांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत. हे सरकार गुंडाना पाठीशी आहे, अशा शब्दात त्यांनी गृहमंत्र्यावर टीका केली. ते म्हणाले की, पूर्वी अंडरवर्ल जसं काम करायचं, आज तसचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत. ते फक्त त्यांच्या टोळ्या चालवत आहेत, असं ते म्हणाले.

काल झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलतांना उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याच्यावर बोलतांना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे, नारायण राणे हे लोक आईसमान पक्ष बदलात. यांची समाजात आणि राजकारणात कवडीचीही प्रतिष्ठा नाही. त्यांच्यावर काय बोलणार. या असल्यान बेईमान आणि गद्दार लोकांनी मंत्री बनवण्याची भाजपला सवय आहे. भ्रष्ट राजकारण्यांच्या मांडीला मांडी लावून आज फडणवीस बसले आहेत, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली.

काल सर्वोच्च न्यायालयाने 14 विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापरावषयी दाखल केलेल्या सुनावणीस नकार दिला. त्याच्यावर भाष्य करतांना राऊत यांनी सांगिलते की, सर्वाच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिल्यानंतर भाजपचे नेते नाचायला लागलेत. त्याच्यातच त्यांना आनंदाच्या किती उकळ्या फुटतात, हे दिसतं. विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास द्यायचा, त्यांना जेरीस आणण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप राऊत यांनी केली.

 

Tags

follow us