Download App

दादा लवकर बरे व्हा… उत्कर्षा  रुपवते संघर्षयोद्धा मनोज जरांगेंच्या भेटीस

Utkarsha Rupwate : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिर्डी लोकसभेतून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी

  • Written By: Last Updated:

Utkarsha Rupwate : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू असताना शिर्डी लोकसभेतून (Shirdi Lok Sabha) वंचित बहुजन आघाडीचे (VBA) उमेदवार असलेल्या उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची नुकतीच भेट घेतली आहे. दादा लवकर बरे व्हा, तुमच्या मार्गदर्शनाचे आम्हाला गरज आहे असे रूपवते म्हणाल्या.

मराठा आरक्षणाची लढाई सुरू असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूपवते यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झालेली आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेसाठी मतदान देखील पार पडणार आहे. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्ष रूपवते यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर रूपवते यांनी आता भेटी गाठींचे सत्र सुरू केले आहे.

दरम्यान मराठा आरक्षणासाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुपवते यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत थेट रुग्णालयात जात जरांगे पाटील यांची भेट घेतली. दादा तब्येतीची काळजी घ्या व लवकर बरे व्हा असे यावेळी उत्कर्षा रूपवते म्हणाल्या.

तसेच पुढे बोलताना रूपवते म्हणाल्या की गरजवंत मराठा समाजाला हक्काचा आरक्षण मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक लढा उभारणारे संघर्ष युद्धे मनोज जरांगे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावेळी यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. यावेळी जरांगे यांना साईबाबा ची मूर्ती भेट देत हवे अशी सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी रूपवते मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यांमध्ये तरुणांची भेट घेतली. मराठा समाजामध्ये तसेच युवा वर्गात जरांगे पाटलांबद्दल मोठी श्रद्धा आहे म्हणूनच दादा तुम्ही लवकर बरे व्हा तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे असे यावेळी रुपवते म्हणाल्या. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रुपवते यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

 मुले मुलींपेक्षा हुशार आहेत का? अभ्यासात समोर आली नवीन माहिती

विविध संघटनांचा रुपवते यांना वाढता पाठिंबा पाहता शिर्डीतील दोन्हीही बलाढ्य उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. मोठा राजकीय वारसा लाभलेल्या रूपवते यांची साधी राहणीमान व उच्च विचारसरणी हे मतदारांना चांगलीच भावत आहे. यामुळे यंदाची शिर्डी लोकसभा चांगलीच गाजणार  असे चित्र निर्माण झाले आहे

follow us

वेब स्टोरीज