Download App

अजित पवारांचा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय; अजितदादांनी उमेश पाटलांना खडसावले

अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असं म्हणत अजिततादांनी उमेश पाटलांचा चांगलाच समाचार घेतला.

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक नेतेही राज्यात दौरा करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही (Ajit Pawar) राज्यभर जनसन्मान यात्रा काढली. मात्र, या दौऱ्याआधीच राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली. दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही’ असे म्हणत अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी मोहोळ बंदची हाक दिली होती. यावरून अजितदादांनी उमेश पाटील (Umesh Patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

561 किमी रेंज अन् ड्युअल सनरूफ फीचर्ससह ‘या’ दिवशी लाँच होणार Kia EV9 

पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी झालेल्या वादामुळे उमेश पाटील यांनी अजित पवारांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवार म्हणाले, कुत्रे गाडी खाली जाते, तसे त्याला वाटतं तोच गाडी चालवते. कोणीतरी पठ्ठ्या म्हणाला, दादाचा दौरा मी रद्द केला. पण अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असं म्हणत त्यांनी उमेश पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. पुढं ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक दौऱ्यावर आल्याने मी मोहोळ दौरा रद्द केला होता, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.

‘पक्षाच्या विरोधात जाल तर, जागा दाखवू’; स्वपक्षाच्या प्रवक्त्याला तटकरेंचा सज्जड दम

अजित पवार पुढे म्हणाले, मोहोळकरांना आगामी काळात देखील निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्द देतो. मोहोळ आणि बारामती फार दूर नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मिळालेल्या पदाचा आणि संधीचा वापर या काळातील लोकांसाठी विकास कसा करता येईल, त्यासाठी करावे. काहीजण टीका करता, मी त्याकडे लक्ष देत नाही. मात्र, आपण जनेतला फसवायचं नाही, लुबाडणूक करायची नाही, असे अजितदादा म्हणाले.

नितेश राणेंवर काय म्हणाले?
मी आजही शिवसेना आणि भाजपसोबतच आहे, पण असं असल तरी मी सेक्युलर विचारधारा सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहे. काही लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्रात द्वेष पसरवत असल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत.

 

follow us