Download App

धनंजय मुंडे राजीनामा देणार का? अजितदादा म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो की..”

धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारे राजीनामा देणार का? या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

Ajit Pawar on Dhananjay Munde Resignation : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर आता मकोका लावण्यात आला आहे. तसेच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारे राजीनामा देणार का? या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? CM फडणवीसांनी एकाच वाक्यात केलं क्लिअर!

अजित पवार पुढे म्हणाले, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्‍यांना सांगितलेलं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री दोषींवर कारवाई करत आहेत. मी इतकं स्पष्ट सांगतो की सगळ्या राज्याला माझी मतं माहिती आहेत. मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हापासून कधीच जातपात नात्यागोत्यांचा विचार केलेला नाही. राज्य चांगलं राहिलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे हेच मी नेहमी पाहत आलोय.

प्रत्येकाने आपली जबाबदारी नीट पार पाडली पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण आहे, ते कसे वागतात, कसे बोलतात, लोकांशी त्यांचे संबंध कसे आहेत याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं. चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

वाल्मिक कराडवर मकोका, परळीत आंदोलन

खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला काल न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तसेच मकोका अंतर्गत कारवाई देखील केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला जातोय. कराडवर मकोका लावण्यात (Santosh Deshmukh Case) आला असून त्याच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. यानंतर कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीड शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केले. वाल्मिक कराडची आई आणि पत्नी देखील या आंदोलनात सहभागी होत्या.

follow us