Download App

शरद पवारांसोबत जाणार का? अजितदादांनी वाढवला सस्पेन्स, म्हणाले, ‘आम्हाला पुन्हा…’

मी सध्या महायुतीचा एक घटक आणि महायुतीसोबतच आगामी निवडणूक लढणार आहे. महायुतीच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा सत्तेत यायचे आहे.

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar on Sharad Pawar : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) तोंडावर आल्या आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते आणि शिंदे गटाचे नेते सातत्याने अजितदादा गटावर टीका करत आहे. त्यामुळं अजित पवार (Ajit Pawar) हे शरद पवार (Sharad Pawar) गटात जातील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता खुद्द अजितदादांनी भाष्य केलं.

Maharashtra Politics : राजकीय आखाड्यात वडिलांचाच पराभव करू पाहणारे ‘पुत्र’ 

इंडिया टुडेने आज अजित पवारांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शरद पवार गटात जाणार का, असं विचारलं असता ते म्हणाले की,
मी सांगितलं आहे की, मी सध्या महायुतीचा एक घटक आणि महायुतीसोबतच आगामी निवडणूक लढणार आहे. महायुतीच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा सत्तेत यायचे आहे. त्यासाठी महायुतीचं सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, जबाबदारी आहे, ती आम्ही पार पाडू, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.

ते म्हणाले, आम्ही तिघेही (भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट) लवकरच जागावाटप करू. 2019 मध्ये प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागांनुसार, जागावाटप केले जाईल. 2019 मध्ये जिंकलेल्या जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठीही हाच फॉर्म्युला आहे. त्यामुळे 200 जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट आहे. उर्वरित जागांवरही लवकच निर्णय घेऊ, असं ते म्हणाले.

मलाही मुख्यमंत्री व्हायचं, पण गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडकते; अजितदादांनी व्यक्त केली खंत… 

शरद पवारांची साथ सोडल्याबद्दल खंत वाटते का? या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, जे काही झाले त्याचा विचार करणे आम्ही सोडून दिलं. आता आम्ही खूप पुढं गेलो. आम्ही आता भविष्याचा विचार करत आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्हाला काम करायचे आहे. महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. जुन्या गोष्टींचा विचार करण्यात आता अर्थ नाही, असं ते म्हणाले.

मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनही पाहू शकत नाही…
समजा तुमच्या समोर शेवटच्या रांगेत शरद पवार बसले आहेत. त्यांना तुम्ही काय सांगाल ? असा सवालही अजित पवार यांना आज विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ते माझे मोठे काका आहेत. मी त्यांना काय सांगणार? मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनही पाहू शकत नाही… मी मान खाली घालेन, असं ते म्हणाले.

सुप्रिया शुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यास अमित शहांनी सांगितले होते का? त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मला कोणी सांगितले नव्हते. मी कोणाचेच ऐकत नाही. निकाल आल्यावर मला समजले की ही माझी चूक होती, असं अजित पवार म्हणाले.

नितीशकुमार यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रमही तुमच्याकडे आहे. मुख्यमंत्री व्हावे असे कधी वाटते का? असा प्रश्न विचारला असता अजितदादा म्हणाले, मलाही वाटतं की, मुख्यमंत्री व्हावं. पण माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडकली आहे. मी पूर्ण प्रयत्न करतोय की गाडी पुढं जावी, पण संधी मिळत नाही. 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण पक्ष नेतृत्वाने ती संधी गमावली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

follow us