Download App

‘स्वत:च निर्णय घेतात अन् सामूहिक दाखवतात’; ‘प्रादेशिक पक्ष’वरुन अजितदादांनी खरं सांगितलं

शरद पवार स्वत:च निर्णय घेतात अन् सामूहिक दाखवतात, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीनकरणाच्या विधानावर खरं सांगितलं आहे.

Ajit Pawar On Shard Pawar : शरद पवार स्वत:च निर्णय घेतात अन् सामूहिक दाखवतात, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांचं (Sharad Pawar) खरं सांगितलंय. शरद पवार यांनी एका मुलाखतीत प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीनीकरण होणार असल्याचं विधान केलं. या विधानानंतर राज्यभरात चर्चेला तोंड फुटलं होतं. त्यावर बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधलायं.

Mahanand Dairy : राज्य सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील महानंद डेअरी गुजरातच्या ताब्यात

अजित पवार म्हणाले, शरद पवारसाहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वत:च निर्णय घेत असतात. बाकीच्या सहकाऱ्यांना फक्त सोबत घेत असतात अन् सामूहिक निर्णय असल्याचं ते दाखवत असतात. त्यांना हवा तोच निर्णय ते ठामपणे घेतात. आम्ही अनेकदा सांगायचो तुम्ही एखादी सभा घ्या पण ते पाहिजे तेच करायचे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

“शरद पवारांचा मुलगा असतो तर संधी मिळालीच असती पण..” अजितदादांनी केलं मन मोकळं

तसेच महाविकास आघाडीत असलेला उद्धव ठाकरे गट मला नाही वाटत की उद्धव ठाकरे हे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. उद्धव ठाकरे यांना मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जवळून पाहिलेलं आहे. त्यावरुन मला वाटत की ते असा निर्णय घेणार नाहीत, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. शरद पवार कधी-कधी संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी अशी विधाने करत असल्याचं अजितदादांनी सांगितलं आहे.

उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर मैदानात, आज कोपरगावात जाहीर सभा

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. बारामती आणि इंदापुर लोकसभा मतदारसंघात चांगलं मतदान झालं आहे. मी ज्योतिष नाहीये, बारामतीची जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावा यावेळी अजित पवार यांनी केलायं. राजकारणात कोणीही कोणाचं शत्रू नसतो, मनात संभ्रम निर्माण करायची असते. म्हणूनच शरद पवारांनी असं विधान केलं असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, पीडीसीसी बँक मध्यरात्रीपर्यंत चालू होती, अशी तक्रार आम्ही केली होती, त्या तक्रारीला निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतले आहे. निवडणूक आयोगाकडून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बँकेच्या मॅनेजरने सहकार्य केलं नाही. सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्या फुटेजमध्ये 40 ते 50 लोक त्या ब्रँचमध्ये, डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये आत बाहेर आत बाहेर करत होते, असा आरोप रोहित पवार यांनी केलायं. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, रोहित पवार याच अलीकडे बॅलन्स बिघडलं आहे, त्यामुळे तो काहीही बडबड करायला लागला असल्याची सडकून टीका केलीयं.

follow us