त्यांच्या उद्योगांवर बोललो तर त्यांचं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; शरद पवार धनंजय मुंडेंवर संतापले
Sharad Pawar Criticize Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या ( Dhananjay Munde ) पहाटेचा शपथ विधी आणि सुनेला परकं म्हटल्याच्या टीकेवरून शरद पवार ( Sharad Pawar ) यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता पवार संतापल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ते म्हणाले की, मुंडेंच्या कोणत्याही टीकेला मी उत्तर देणार नाही. त्यांची तेवढी लायकी नाही. तसेच मी जर त्यांच्या उद्योगांवर बोललो तर त्यांचं महाराष्ट्रात फिरण अवघड होईल.
ऐकावं ते नवलच! सासूवर जावयाचा जडला जीव; सासऱ्याने घेतला मोठा निर्णय
यावेळी पवार म्हणाले की, मुंडेंच्या कोणत्याही टीकेला मी उत्तर देणार नाही. ज्यांचं नाव तुम्ही घेत आहात त्यांची तेवढी लायकी देखील नाही. त्यांना मी कशा कशातून बाहेर काढलं. याची यादी वाचली तर त्यांचं महाराष्ट्रात फिरण अवघड होईल. त्यामुळे त्यांनी केलेल्या उद्योगांवर मी आता बोलू इच्छित नाही. त्यांना लहान कुटुंब, लहान समाजातील उद्योन्मुख तरूण म्हणून संधी दिली. लोकांची त्यांच्यावर नाराजी होती. हे सगळं माहित असताना देखील ते आता माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करत आहेत. कुटुंबावरून टीका करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर यापुढे मी बोलणार नाही. आज त्यांचा शेवटचा उल्लेख मी करत आहे.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादीच फुट पडल्यानंतर अजित पवारांसोबत जाऊन मंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर पहाटेचा शपथ विधी आणि अजित पवारांच्या पत्नी म्हणजेच शरद पवारांच्या सुनबाई यांना पवार परकं म्हणाले त्यावरून टीका केली होती. पहाटेच्या शपथ विधीबद्दल मुंडे म्हणाले होते की, 2017 ला आमची भाजपसोबत बैठक झाली होती. त्यामध्ये लोकसभा, विधानसभा आणि मंत्रीपदं या सर्वांबाबत ठरलं होतं. पण नंतर साहेबांनी शब्द फिरवला. मी हे खरं बोलत आहे. हवी तर त्यासाठी माझी आणि साहेबांची नार्को टेस्ट जरी केली तरी सत्य हेच समोर येईल.
दक्षिण मुंबई स्वतःकडे ठेवण्यात शिंदेंना यश; यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर..
तर सुनेत्रा पवारांना शरद पवार हे बाहेरचे पवार म्हटले होते त्यावर मुंडे म्हणाले की, सुनेला परकी म्हणता तुमच्याही घरात लेकी आहेत. एका निवडणुकीसाठी सुनेला परकं म्हणत असतील तर अशी वेळ कुणावरही येऊ नये. पण सुनेला परकं म्हणण्या एवढे तुम्ही निगरगट्ट कसे झालात असा सवाल देखील मुंडे यांनी विचारला होता. त्यावर माध्यमांनी पवारांना प्रश्न विचारला असता पवार मुंडेवर संतापल्याचं पाहायला मिळालं. आपण हे शेवटचं मुंडेंवर बोलत आहोत असंही पवार म्हणाले.