ऐकावं ते नवलच! सासूवर जावयाचा जडला जीव; सासऱ्याने घेतला मोठा निर्णय

ऐकावं ते नवलच! सासूवर जावयाचा जडला जीव; सासऱ्याने घेतला मोठा निर्णय

Son In law Marries With Mother In Law : कधी काय आणि कुणामध्ये काय घडेल याचा काही नेम नाही. ही बिहारमधली घटना. जावयाचा जीव सासूवर जडला. तो इतका जडला की लग्नचं लाऊन द्यावं लागलं. नोंदनीपद्धतीने हा रितसर विवाह पार पडला. (Marries ) अस लग्नही पक्क लावलं. मात्र, यामध्ये सासऱ्याने आनंदाने आपल्या बायकोचा विवाह जावयाबरोबर लाऊन दिला हा मोठा चर्चेचा विषय झालाय.

 

रंगेहात पकडलं

बिहारमधील बंका जिल्ह्यात हा जावई-सासू विवाह झालाय. सिकंदर यादव (वय 45) असं जावायाचं नाव आहे. तर, गीता देवी (वय 55) असं सासूचं नाव आहे. यामध्ये झालं असं की, गीता देवी यांची मुलगी आणि सिकंदर यादव यांची पत्नी मृत्यू पावल्यानंतर ते आपल्या सासरी राहण्यासाठी गेले होते. त्या काळात त्यांचं आपल्या सासूवर प्रेम झालं. त्याबाबत सासरे दिलेश्वर दर्वे यांना याबाबत शंका आली. त्यानंतर त्यांनी पाळत ठेऊन यांना एका दिवशी थेट रंगेहात पकडलं.

 

पंचायत बसवली

आता या प्रकरणात रंगेहात पकडल्यावर सासू अन् जावयाची झाली मोठी पंचाईत. सासरे गरम निघाले. त्यांनी या विषयावर थेट पंचायत बसवली. त्यामध्ये या दोघांनीही आम्ही एकमेकांवर प्रेम करतो असं सांगितलं. त्यानंतर सासरे म्हणजे दिलेश्वर दर्वे यांनी आपली पत्नी गीता देवी आणि जावई सिकंदर यादव यांचं थेट लग्नच लाऊन देण्याचा निर्णय घेतला. मग काय? गावकऱ्यांच्या उपस्थितीत सासरे जावई झाला विवाह. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरूये.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube