पूजा सावंतच्या शाही विवाहसोहळाचा थाट; अभिनेत्रीने शेअर केले खास क्षण, पाहा फोटो

अखेर अभिनेत्री पूजा सावंत झाली चव्हाण घराण्याची सून!'

मराठी सिनेसृष्टीत एक शाही विवाहसोहळा पार पडला. तो म्हणजे सगळ्यांची लाडकी पूजा सावंतचा. काल मुंबईत सिद्धेश चव्हाणसोबत आयुष्यभराची गाठ बांधली.

पूजा आणि सिद्धेश चव्हाणच्या वेडिंग फंक्शन्सला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली होती. तिच्या मेहंदी, हळद, संगीतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण या क्युट कपलने खूप धमाल केली. तसंच मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या आनंदात सहभागी होती.

काल 28 फेब्रुवारी रोजी पूजा आणि सिद्धेशने साताजन्माची गाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो कधी येतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागलं होतं. अखेर पूजाने तिच्या शाही विवाहसोहळाचं अल्बमच पोस्ट केला आहे.

पूजा सावंतच्या लग्नसोहळ्याला कुटुंबियांसह मनोरंजनक्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

पूजा सावंतने पिवळी नऊवारी, हातात हिरव्या बांगड्या, डोईला मुंडावळ्या, साजेसे दागिने या नव्या नवरीच्या लूकमध्ये सौंदर्य खुलून आलं आहे.
