मुक्काम पोस्ट देवाचं घर! अभिनेत्री पूजा सावंतने लिहिलं स्वामी समर्थांना पत्र
Actress Pooja Sawant’s letter to Swami Samarth : अभिनेत्री पूजा सावंतचा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तिने या निमित्ताने स्वामी समर्थांना पत्र लिहिलंय. अभिनेत्री पूजा सावंतनं (Pooja Sawant) भावनिक मुद्द्यावर स्वामी समर्थांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे.’मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री पूजा सावंतने स्वामी समर्थांना पत्र लिहिल्याने सगळीकडे चर्चा होत आहे.
View this post on Instagram
आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात पत्र लिहिणं दुर्मीळ झालं आहे. मात्र, पत्र लिहिणं हा अतिशय भावनिक असतं. अभिनेत्री पूजा सावंतनं स्वामी समर्थांना पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाच्या (Mukkam Post Devache Ghar) निमित्तानं पूजानं स्वहस्ते पत्रलेखन करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध केला आहे.
सुदर्शन घुले : हिंदी सिनेमातील स्क्रिप्टलाही लाजवेल असा ‘मोस्ट वाँटेड आरोपी’
पूजा स्वतः स्वामीभक्त आहे. त्यामुळे पूजानं अत्यंत तळमळीनं स्वामींना पत्र लिहिलं आहे. त्यात पूजानं स्वतःसाठी काहीही न मागता अतिशय भावनिक मुद्दा मांडला आहे. मुक्या प्राण्यांची मदत करण्याची बुद्धी सर्वांना (Entertainment News) मिळावी, भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही इतकं सक्षम करा, माझा पत्ता जरी सध्या बदललेला असला तरी मन मोकळ करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवण्याचा पत्ता मला मिळाला आहे, अशी भावना पूजानं पत्रात व्यक्त आहे. त्यामुळे या पत्रातून पूजाचं प्राणीप्रेमही दिसून येत आहे.
लई अवघड हाय गड्या उमगाया “बाप्पा “रं… मिटकरींची पोस्ट चर्चेत, वाल्मिक कराड अन् बजरंग सोनवणे एकत्र?
मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे आहेत. संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार – महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.