ठाकरेंचा पक्ष सेक्युलर आहे का? ओवेसींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

ठाकरेंचा पक्ष सेक्युलर आहे का? ओवेसींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शनिवारी मुंबईतील मुंब्रा येथे जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना सेक्युलर आहे का ?असे राहुल गांधी म्हणू शकतात असे म्हणतच ओवेसी यांनी ठाकरेंसह राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

शनिवारी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ९० च्या दशकात झालेल्या दंगलीवरून त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. ओवेसी म्हणाले की, मुंब्रा अस्तित्वात का आला? वडीलधाऱ्यांना मुंबईतून पळून इथे येण्यास भाग पाडणारे कोण होते? मी काहीही विसरलो नाही आणि तुम्ही मला विचारता की मला उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे का?

ते म्हणाले की, मी ते दिवस विसरू शकत नाही जेव्हा टाडा अंतर्गत लोकांना तुरुंगात टाकले जात होते. उद्धव ठाकरे गट सेक्युलर असल्याचा दावा केला जात आहे, असेही ओवेसी म्हणाले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकच आहेत. शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे असे राहुल गांधी म्हणू शकतात का?, असा सवाल ओवेसी यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही निशाणा साधला.

जेलमध्येच गॅंगवॉर… मुसेवाला मर्डर केस प्रकरणातील आरोपी ठार

ओवेसी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी AIMIM चा पाठिंबा हवा होता असा दावा त्यांनी केला. परंतु, संकटाच्या वेळी जेव्हा मुस्लिम समाजाला आधाराची गरज होती, तेव्हा ते विसरले, त्यावेळी पवार कधीही पुढे आले नाहीत, आम्हाला आमच्या नशिबावर सोडले. ही कसली धर्मनिरपेक्षता आहे? असा सवाल त्यांनी पवार यांना केला.

तारक मेहता… शो मधील ‘हा’ कलाकार दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

माझ्यावर भडकाऊ भाषणाचा आरोप आहे, पण मी खरे बोलत असल्याचे ओवेसी म्हणाले. ते म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष मुस्लिम आरक्षणावर बोलत नाही. महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळू नये का? महाराष्ट्रात सर्वाधिक भूमिहीन मुस्लिम आहेत. या सर्व मुद्द्यावर शरद पवार बोलणार नाहीत, असेही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube