तारक मेहता… शो मधील ‘हा’ कलाकार दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

तारक मेहता… शो मधील ‘हा’ कलाकार दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

मुंबई : छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. यातील प्रत्येक कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यातच या मालिकेतील महत्वाचे पात्र तारक मेहता यांच्याबाबत एक महतवाची माहिती समोर आली आहे. मालिकेतील तारक मेहता ही भूमिका साकारणारे सचिन श्रॉफ हे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील चांगलेच व्हायरल झाले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील अभिनेता सचिन श्रॉफने शनिवारी (२५ फेब्रुवारी) मुंबईत चांदनी कोठीसोबत लग्नगाठ बांधली. सचिन यांनी पहिली पत्नी जुही परमारशी घटस्फोट घेतल्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी दुसरं लग्न केलं आहे. त्याच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो अभिनेत्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर करण्यात आले आहेत. याप्रसंगी मुनमुन दत्ता, दिलीप जोशी, जेनिफर मिस्त्री बन्सीवाल, अंबिका रांजणकर, सुनयना फोजदार आणि इतरांसह TMKOC च्या कलाकारांनी लग्नाला हजेरी लावली होती.

जेलमध्येच गॅंगवॉर… मुसेवाला मर्डर केस प्रकरणातील आरोपी ठार>

अभिनेते सचिन श्रॉफने 2009 मध्ये अभिनेत्री जुही परमारशी लग्न केले होते, दोघांना समायरा नावाची मुलगी आहे. 2018 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. अभिनेत्री जुही परमारपासून विभक्त झाल्यानंतर, अभिनेत्याने आपला संसार पुन्हा थाटण्याचा निर्णय घेतला आणि 25 फेब्रुवारी रोजी सचिन यांनी चांदणी कोठी सोबत सातफेरे घेतले.

PM Kisan Scheme : मोदी शेतकऱ्यांच्या खात्यांत 16 हजार कोटी रुपये जमा करणार

करिअर :
सचिन श्रॉफ हर घर कुछ कहते है आणि नागिन में अर्जुन, सिंदूर तेरे नाम का, सात फेरे: सलोनी का सफर, नाम गम जायेगा, शगुन आणि इतर अनेक टीव्ही शोचा भाग आहे. आता त्यांनतर सचिन छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो तारक मेहता का उलटा चष्मा यामध्ये अभिनय करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube