Download App

रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? अजितदादा म्हणाले, ‘त्यांनी वेगळा निर्णय…’

रामराजे नाईक निंबाळकरांच्यासोबत आमचं बोलणं झालं आहे, अजून तरी वेगळा निर्णय त्यांनी घेतलेला नाही - अजित पवार

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar on Ramraje Nimbalkar : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीमध्ये (Mahayuti) मोठी बंडखोरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाकडे जाणाऱ्यांचा कल वाढला. काहीच दिवसांपूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली. तर आता रामराजे निंबाळकरही (Ramraje Nimbalkar) तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा द्यावी; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

राजराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे देखील तुतारी हाती घेणार आहे. 14 तारखेला फलटणमध्ये होणाऱ्या जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. महायुतीती आल्यानंतर दिलेली आश्वासने पाळली न गेल्याने निंबाळकर कुटुंबीयांकडून साथ सोडली जात असल्याची सुत्रांची माहिती आहे. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलं.

अजित पवार म्हणाले की, रामराजे नाईक निंबाळकरांच्यासोबत आमचं बोलणं झालं आहे, अजून तरी वेगळा निर्णय त्यांनी घेतलेला नाही, असं अजितदादांन सांगितलं.

आझाद मैदानावर शिंदेंची तोफ धडाडणार, विधानसभेचे वातावरण तापणार?  

यावेळी बोलतांना त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता टोलाही लगावला. आयाराम-गयाराम यांच्याबद्दल जे बोलत होते, तेच आता आयाराम गयारामांना पक्षात घेत आहेत, आपल्याकडे चाळीस -बेचाळीस विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याकडे 20-25 शिल्लक आहेत त्यामुळे तिकडे प्रवेश होत आहेत, असा टोला अजितदादांनी लगावला.

रामराजेंनी घेतली अजित पवारांची भेट?

दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी महायुतीत होणारा अन्याय आणि त्रासाचा दाखला देत तुतारी हाती घेण्याची भूमिका मांडली होती. मात्र, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. मात्र, आता या सर्वांचाच निर्णय पक्का झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या संदर्भात रामराजे नाईक निंबाळकरांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळं 14 तारखेच्या मेळाव्याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय.

follow us