Download App

आरपीआयला जागा द्या, आठवलेंचा अजितदादांना फोन, दादा म्हणाले, ‘मला सांगून उपयोग नाही…’

मला एकट्याला भेटून काहीच उपयोग नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांना देखील भेटावं लागेल आणि मग एक-दोन दिवसात तुमच्या जागा फायनल करू

  • Written By: Last Updated:

Ramdas Athawale : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्यात आहेत. महायुतीमधील (Mahayuti) जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आज-उद्या अजित पवार (Ajit Pawar) गटाची यादीही जाहीर होऊ शकते. अशाचत आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) विधानसभा निवडणुकीसाठी जागांची मागणी केली. त्यांनी अजित पवारांशीही संपर्क साधला. मात्र, मला एकट्याला भेटून उपयोग नसल्याचं अजितदादांनी सांगितल्याचं आठवले म्हणाले.

महाविकास आघाडीतील जागा वाटपासाठी मुंबईत आणखी एक बैठक; यादी कधी जाहीर होणार ? 

आज रामदास आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पाच-सहा जागा मागितल्या. तसेच मी अजित पवारांना देखील बोललो की, मला आपणास भेटायचे आहे, त्यावर अजित पवारांनी सांगितले की, मला एकट्याला भेटून काहीच उपयोग नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटावं लागेल आणि मग एक-दोन दिवसात तुमच्या जागा फायनल करू, असं सांगितल्याचं आठवले म्हणाले.

निवडणुकीमुळे विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटताहेत; CM शिंदेंची फटकेबाजी… 

विधानसभेसाठी कोणती जागा आपल्याला सोडता येऊ शकते, यासाठी उद्या तीनही नेत्यांचा वेळ घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आठवले म्हणाले.

आम्हाला दुर्लक्षित करू नका…
पुढे बोलताना आठवले म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुतीला अडचणीत आणण्याची आमची भूमिका नाही. आम्ही समंजस आहोत. आम्हाला महायुतीसोबतच राहायचे आहे. पण, आम्हाला एकदम दुर्लक्ष करू नये, एवढचं म्हणणं आहे, असं ते म्हणाले.

मुंबईतील आम्ही धारावी आणि चेंबूरची जागा मागितली आहे. या दोनपैकी एक जागा आम्हाला मिळावी, अशी आमची मागणी आहे. मराठवाड्यातही आमची चांगली पकड आहे, असे सांगत रामदास आठवलेंनी मराठवाड्यातही जागा मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

 

follow us