Download App

‘आता पोट वाढलं तर मी काय करु’; अजितदादांचा आव्हाडांना प्रतिसवाल

Ajit Pawar On Jitendra Awhad : आता पोट वाढलं तर मी काय करु, पण ते नूसतचं वाढलंय कोणता महिना गेलेला नसल्याचं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना दिलं आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी आव्हाडांना प्रतिसवाल केला आहे. ते नागपूरमधून बोलत होते.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तणाव वाढत चालला आहे. सुरुवातीच्या काळात एकमेकांवर जपून टीका करणारे नेते आता जोरदार टीका करू लागले आहेत. अजित पवार यांनी कर्जत येथील शिबिरात अनेक धक्कादायक खुलासे केले. थेट शरद पवार यांनाच निशाण्यावर घेतले. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही निशाण्यावर घेतले होते.

जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटानवरही अजितदादांनी टीका केली होती. त्यांची ही टीका आव्हाडांना चांगलीच झोंबली आहे. त्यांनीही अजित पवार यांचा एक फोटो ट्विट करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड यांनी मिश्कील भाषेत अजित पवार यांच्यावर टीप्पणी केली.

मोठी बातमी : अखेर जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार : POK सहीत विधानसभेची पुनर्स्थापना

या पोस्टमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे, की दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करून 6 पॅक अॅब्स केले असतील पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. हा हा.. असा खोचक टोला आव्हाड यांनी लगावला. त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना त्यांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला होता. यावरच आव्हाडांनी खास त्यांच्या स्टाइलमध्ये अजितदादांना उत्तर दिले. सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तणाव वाढला आहे. मागील आठवड्यात कर्जत खालापूर येथे झालेल्या अजित पवार गटाच्या शिबिरात अजित पवार, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी इतिहासातील अनेक गोष्टींचा उल्लेख करत धक्कादायक खुलासे केले. त्यांच्या या आरोपांनंतर शरद पवार गटात अस्वस्थता वाढल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नेत्यांकडूनही या आरोपांवर प्रत्युत्तर दिले जात आहे.

Tags

follow us