मोठी बातमी : अखेर जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार : POK सहीत विधानसभेची पुनर्स्थापना
POK : लोकसभेमध्ये जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावर चर्चा सुरू आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. की, जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावर सर्वांची सहमती आहे. त्यामुळे आता जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणजे पाक व्याप्त कश्मीरसह जम्मू-कश्मीर विधानसभेचे पुनर्स्थापना करण्यात येणार आहे.
POK सहीत विधानसभेची पुनर्स्थापना…
या विधेयकावर बोलताना शाह म्हणाले की, हे विधेयक कश्मीरी पंडितांना न्याय देणारं विधेयक आहे. ज्यांच्यावर गेल्या 70 वर्षांपासून अन्याय झाला आहे. ज्यांना दुर्लक्षित करण्यात आलं आहे. त्यांना या विधेयकाच्या माध्यामातून न्याय मिळणार आहे. त्या लोकांचा यामुळे विकास होणार आहे. कश्मीरी पंडितांना त्यांच्याच देशात विस्थापित म्हणून जगावं लागंल आहे. त्यामुळे त्यांना आता जम्मू-कश्मीर विधानसभेत आरक्षण मिळणार आहे.
#WATCH | Union Home Minister Amit Shah speaks on The Jammu and Kashmir Reservation (Amendment) Bill, 2023 & The Jammu and Kashmir Reorganisation Bill, 2023
He says, "…Two seats will be reserved for Kashmiri Migrant community members, and one seat in the Jammu and Kashmir… pic.twitter.com/dLE0erAqDG
— ANI (@ANI) December 6, 2023
या विधेयकामुळे आता कश्मीरचा पाक व्याप्त कश्मीर हा भाग देखील विधानसभेच्या अखत्यारित येणार आहे. कारण यामध्ये जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर विशेष म्हणजे पाक व्याप्त कश्मीरसह जम्मू-कश्मीर विधानसभेचे पुनर्स्थापना करण्यात येणार आहे. नव्या विधेयकानुसार जम्मू-कश्मीरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यापुढे कश्मीरच्या बाहेरील जे विस्थापित झाले आहेत.
Amit Shah : ‘नेहरूंच्या चुकीमुळचे ‘POK’ चा वाद’; अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2 नॉमिनेटेड सदस्य आणि अनधिकृत पाकिस्तानच्या भागातील 1 नॉमिनेटेड सदस्याची निवड केली जाईल. त्यामुळे अगोदर विदानसभेत सर्व मिळून 3 नॉमिनेटेड सदस्य होते. आता 5 नॉमिनेटेड सदस्य असणार आहेत. त्याचबरोबर या बदलांमुळे जम्मू भागातील विधानसभेच्या जागा 37 वरून 43 वर जाणार आहेत. तर कश्मीरमध्ये त्या 46 होत्या तर आता 47 विधानसभेच्या जागा असणार आहेत.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, मला आनंद आहे की, या विधेयकाला विरोध झाला नाही. सहा तास चर्चा चालली. पण ज्यांच्यावर दहशतवाद संपवण्याची जबाबदारी होती. ते इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते. जे विचारत होते कश्मीरी पंडितांना आरक्षण दिल्याने काय होणार? मी त्यांना सांगेन की, त्यामुळे कश्मीरी पंडितांचा आवाज कश्मीर विधानसभेत पोहचणार आहे. तसेच विस्थापन देखील थांबेल.
तर कलम 370 हटवल्यावर देखील असंच विचारल जात होतं. मात्र कश्मीरी पंडितांचा नागरिकांचा आवाज मोदींनी ऐकला. त्यामुळे त्यांनी त्यांचा अधिकार मिळाला आहे. कारण नरेंद्र मोदी देखील गरिब परिवारातून येतात. त्यांनी त्याचं दुःख समजत