Download App

ते माझ्या दृष्टीने भाजपचे नेते नाही, त्यांच्याशी घेणं-देणं नाही; अजितदादांनी सुरेश धसांना धुडकावले !

Suresh Dhas हे माझ्या दृष्टीने भाजपचे नेते नाहीत. त्यांच्याशी घेणं-देणं नाही. मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो, dcm Ajit Pawar

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar On Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मिक कराडला अटक करावी, मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस (Dhananjay Munde) हे आक्रमक आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही भाष्य केले आहे. सुरेश धस हे माझ्या दृष्टीने भाजपचे नेते नाहीत. त्यांच्याशी घेणं-देणं नाही. मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो. वेगवेगळ्या पक्षातील खालच्या कार्यकर्त्यांशी बोलायला लागलो तर त्याला काही अंत राहणार नाही, असा टोला अजित पवार यांनी धस यांना लगावला आहे.

जसप्रीत बुमराहने करून दाखवलं, ‘सर गारफील्ड सोबर्स’ पुरस्कार जिंकणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का घ्यावा, तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पाहिजे, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. त्यावरून अजित पवार यांनी सुरेश धस यांचा जोरदार समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, सुरेश धस यांना काय वाटतंय, त्याच्याशी मला घेणं-देणं नाही. मी सरकारमध्ये भाजपबरोबर पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुती सरकारचे सरकार व्यवस्थित काम करावे, असा निर्णय घेतो. आम्ही निर्णय घेताना प्रमुख लोकांशी चर्चा करत असतो. वेगवेगळ्या पक्षातील खालच्या कार्यकर्त्यांनी बोलायले लागलो तर त्याला काही अंत राहणार नाही. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात भाजपची भूमिका असेल तर गृहमंत्री अमित शाह सांगतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे हे सांगतील, आम्हाला नड्डा हे सांगतील.


घाबरायचं नाही, इथं बाप बसलाय; मी असल्यावर…वाल्मिक कराड व पोलिस अधिकाऱ्याचा कॉल रेकॉर्ड व्हायरल !

नेते मंडळी धनंजय मुंडेंवर खापर फोडत नाही. ते खालचे कार्यकर्ते फोडत आहेत. नेते मंडळी यांच्याशी मी संपर्का आहेत. तुम्ही कुणाला नेतेमंडळी म्हणताय मला माहीत नाही. ज्यांना मी नेते समजतो, ते वेगळे आणि तुम्ही जे नेते समजतात, ते वेगळे आहेत. ते माझ्या दृष्टीने पक्षाचे नेते नाहीत, असे खडेबोल अजित पवार यांनी माध्यमांनी लगावले.

बाकीच्यांनी फुकटला सल्ला देऊ नये

नैतिकतेच्या आधारेवर अनेकांनी राजीनामा दिलेले आहेत. या सरकारमध्ये नैतिकता नाही, त्यामुळे धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जात नाही, असा आरोप
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर केलाय. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, या सरकारकडे नैतिकता आहे की नाही हे मला चांगले माहिती आहे. बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देऊ नये, असे सुनावले आहे.

follow us