धनंजय मुंडेंच्या राजीनाचा दबाव कायम; पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जाणार बीडला

  • Written By: Published:
धनंजय मुंडेंच्या राजीनाचा दबाव कायम; पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जाणार बीडला

Ajit Pawar Beed : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने अनेक घडामोडी रोज नव्याने घडत आहेत. (Beed ) मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी राजकीय दबाव वाढत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार येत्या गुरुवारी बीडमध्ये येणार आहेत. बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत. येत्या 30 जानेवारीला अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे.

Video : अजित पवारांच्या निकटवर्तीयांने नागरिकाला उचलून आपटलं; डोक्याला व गुडघ्याला जखम

बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच चिघळलं आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप होत आहे. खंडणी ते खून प्रकरण या संपूर्ण घटनाक्रमात धनंजय मुंडेच सूत्रधार असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे. तर, दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर भाजप आमदार सुरेश धस यांनी बोट ठेवल्यानंतर तपासाला वेग आला आहे.

बीडमध्ये आढावा बैठक

येत्या 30 जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक देखील पार पडली. बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहेत. 30 जानेवारी रोजी सकाळी 10:00 वाजता ही बैठक होईल. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube