अजित पवारांकडे पुरावे देणार, मुंडेंची आमदारकीही रद्द झाली पाहिजे; अंजली दमानिया आक्रमक…

  • Written By: Published:
अजित पवारांकडे पुरावे देणार, मुंडेंची आमदारकीही रद्द झाली पाहिजे; अंजली दमानिया आक्रमक…

Anjali Damania : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं. संतोष देशमुख यांना न्याया मिळावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चे (Janaakrosh Morcha) निघत आहेत. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्याचा ज्या वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप होतोय, तो मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) जवळचा असल्याचं बोलल्या जातंय. त्यामुळं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

पठाण अन् फायटर; सिद्धार्थ आनंदने प्रजासत्ताकदिनी घातला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ 

अजित पवारांनी धनंजय मुंडेच्या विरोधात पुरावे हवेत आहेत, तर ते द्यायला मी तयार आहे, त्यांनी मला भेटीसाठी वेळ द्यावी, मुंडेंच मंत्रिपद काय तर आमदारकीही रद्द झाली, अशी मागणी दमानिया यांनी केली.

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यातील वातारवण चांगलचं तापलं. भाजप आमदार सुरेध धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हे प्रकरण उचलून धरलं. दमानिया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी लिहिलं की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे. अजित पवार आणि माझा ३६ चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन, पण बीडचे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा हैवाण लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता, असं दमानिया यांनी म्हटलं.

मोठी बातमी! वक्फ दुरुस्ती विधेयकाला मान्यता, जेपीसीने केले 14 बदल 

आमदारकीही रद्द झाली पाहिजे
हैवाण लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? मग वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत, कसे व्यवहार एकत्र आहेत, धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे Mahagenco शी कसे व्यवहार करत आहेत? हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली आहे. हे Office of Profit आहे आणि मंत्रिपद काय तर आमदारकीही रद्द झाली पाहिजे. बघू कधी वेळ देतात? असं दमानिया यांनी म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube