Ajit Pawar News : जर कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर राष्ट्रवादी पक्ष विरोध करत राहील, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलीयं. मागील काही दिवसांपासून महायुतीतील नेत्यांकडून मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज आळंदीत एका कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी हे विधान केलंय. यावेळी अजित पवार यांना रोख नेमकं कोणाकडे होता, हे समजू शकले नाही.
अजित पवार म्हणाले, राजकीय पक्षातील कोणी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, धर्माबद्दल वाईट बोलते तेव्हा समाजात दुही निर्माण होते, असं होता कामा नये, तुम्हाला विचार मांडायचेत मांडा, हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही तुमचं मत मांडायला हरकत नाही पण वेगळ्या पद्धतीने बोलला समाजात तेढ निर्माण कराल तर ते समाजासाठी चांगली नाही. शिव-शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही, राष्ट्रवादी पक्ष या गोष्टींचा तीव्र विरोध करीत राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळण्याची राहुल गांधींना हौस, विखेंचा हल्लाबोल
तसेच अशा गोष्टींचा आम्ही कठोर शब्दांत आम्ही त्यांचा विरोध करू. तसेच अशा प्रकरणांमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता असेल ती करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
नंबरचा चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या ‘आयड्रॉप’चा विक्री परवाना निलंबित; कारण काय?
दरम्यान, रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम धर्मीयांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानानंतर मुस्लिम समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही दिवसांपासून हे प्रकरण राज्यात चांगलच गाजलं होतं.