आधीचे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायचे अन् त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे; फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या निवासस्थानी गणेशपूजा सोहळ्यानिमित्त हजेरी लावली. यावेळी मोदींनी गणरायाची आरतीही केली. मात्र नरेंद्र मोदींनी न्या. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud)यांच्या घरी भेट दिल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे प्रोटोकॉलला धरून आहे का?, असा सवाल विरोधक करत आहे. विरोधकांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जोदरार प्रत्युत्तर दिलं.
डाव्या चळवळीचं नेतृत्त्व हरपलं! सामान्य कार्यकर्ता ते महासचिव; कशी आहे सिताराम येचुरीची कारकीर्द?
आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का?, का असा सवाल फडणवीसांनी केला.
गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते.
देशाचे मा. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल मा. पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील… pic.twitter.com/qyDWliS4Lq— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 12, 2024
फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिलं की, गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. देशाचे मा. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल मा. पंतप्रधानांनी गणरायची पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन देखील केलं. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस चाणक्य हुशार वाटायचे पण फोडाफोडीतच हुशार; मनोज जरांगेंची जहरी टीका
पुढं त्यांनी लिहिलं की, फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवत असतं, आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? प्रश्न गहन आहे, असं फडणवीस म्हणाले.
हा महाराष्ट्रीय सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा… अपमान नाही का?, असा सवालही फडणवीसांनी केला.
विरोधकांची टीका काय ?
सरन्यायाधीस पदावर चंद्रचूड यांसारखी व्यक्ती असतांना तीन वर्षे एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातंय. घटनाबाह्य पद्धतीने सरकारल पाडलं जातंय, हे सरकार असंवैधानिक आहे, असं सरन्यायाधीश स्वत: वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही आणि ते आता निवृत्तीला आले, काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्यामुळं सरकार वाचवण्यासाठी वेगळ काही घडतयं का, असा सवाल राऊतांनी केला होता.