Devendra Fadnavis : मला आणि भाजपाच्या नेत्यांना अटक करण्यासंदर्भात परमबीर सिंह जे काही वक्तव्य केलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे. याचा सगळा प्रयत्न झाला. त्यांनी तर फक्त एकच घटना सांगितली पण अशा किमान चार घटना आहेत. ज्यामध्ये खोट्या केस करून मला अटक कशी करता येईल याचं षडयंत्र झालं. या सगळ्या षडयंत्रांचा पर्दाफाश आम्ही करू शकलो. या प्रकारांचे व्हिडिओ पुरावे आम्ही सीबीआयला दिले. आजही अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केलेल्य आरोपांबाबत विचारलं. त्यावर फडणवीसांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी असेल गिरीश महाजन असतील प्रवीण दरेकर असतील असे आमचे अनेक नेते आहेत ज्यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतलीही होती. परंतु, या गोष्टी ते करू शकले नाहीत कारण अनेक अधिकारी असेही होते ज्यांनी त्या त्या वेळी त्या त्या पातळीवर अशा खोट्या केसेस करण्यास नकार दिला.
परमवीर सिंह अन् फडणवीसांमध्ये डील? देवेंद्र फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला