Download App

राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक, पण युतीबाबतचा चेंडू फडणवीसांनी टोलवला

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis on Raj Thackeray : अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळं मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आला. आता युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊतांनी सांगलीत ‘आग’ लावली… ठाकरे गटाचा ‘जाळ’ होणार? 

राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा मांडल्याने त्यांच्याशी जवळीक वाढली, मोदींना पंतप्रधान करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती.आताही त्यांनी मोदींना पाठिंबा द्यावी ही अपेक्षा, असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

Sharad Pawar : गडी थांबणारा नाही; वय काढणाऱ्यांविरोधात पवारांचा शड्डू; सांगितलं कधीपर्यंत काम करणार 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला, तेव्हापासून त्यांच्याशी जवळी वाढली. आता आमची अपेक्षा अशी आहे की, 2014 मध्ये राज ठाकरेंनी मोदीजींना पाठिंबा दिला होता. मोदींनी पंतप्रधान व्हावे अशी राज ठाकरेंची इच्छा होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या भूमिकेत बदल झाला होता. पण, गेल्या दहा वर्षात मोदींना भारताचा विकास केला हे राज ठाकरेंनाही मान्य असेल, असं फडणवीस म्हणाले.

मनसे मोदींना पाठिंबा देईल
नव्या भारताच्या उभारणीसाठी जनतेने मोदींच्या मागे उभे राहिले पाहिजे. ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे, अशा विचारांनी प्रेरित लोकांनी मोदींसोबत राहायला पाहिजे, राज ठाकरे आणि मनसे मोदींना पाठिंबा देईल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून असल्याचं फडणवीस म्हणाले.

मनसेला लोकसभेचा जागा देणार का? महायुतीचा विस्तार होणार का? असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता फडणवीसांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर मोठ्या चतुराईने भाष्य करणं टाळलं.

दरम्यान, गुढीपाडव्याला मनसेची सभा आहे, त्यामुळे या दिवशी मनसे-भाजप युतीची घोषणा होणार का आणि राज ठाकरे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us