Devendra Fadnavis : भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर फडणवीस यांचं कार्यालय (Devendra Fadnavis Office) आहे. एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला. या घटनेमुळं एकच खळबळ माजली. दरम्यान, यावर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.
विधानसभेपूर्वी काँग्रेसचा मोठा निर्णय, 13 नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, ‘हे’ आहे कारण
शिर्डी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मंत्रालयातील घटनेविषयी विचारलं असता फडणवीस म्हणाले की, कार्यालयाची तोडफोड झाल्याची ही आजची नाही. ही घटना काल घडली. त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने हे कशाकरिता केलं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्विगणतेमधून तिने हे कृत्य केल का? किंवा तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ, असं फडणवीस म्हणाले.
The Tribe Trailer: अलाना पांडेच्या ‘द ट्राइब’चा ट्रेलर रिलीज, कधी आणि कुठे जाणून घ्या…
पुढं ते म्हणाले, त्या महिलेनं द्विगणतेमधून हे कृत्य केल का? किंवा तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. त्या महिलेची व्यथा दूर करण्यास आम्ही प्रयत्न करू. महिलेला कुणी पाठवले का, याचीची चौकशी करू, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, लाडक्या बहिणीचा राग अनावर झाला म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालयात तिचा असंतोष पाहायला मिळाला, अशी टीका विरोधकांनी केली आहे. या टीकेबाबत फडणवीस यांनाही विचारले असता ते म्हणाले, विरोधकांकडे कोणतेही मुद्दे उरले नाहीत. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत. मला जर टीका करायची असेल तर मी अनेक गोष्टी सांगू शकतो.
त्यांच्या काळात काय-काय झाले हे मलाही सांगता येईल. पण कोणी खालच्या पातळीवर उतरलं म्हणून माझ्या सारख्यांनी खालच्या स्तरावर थोडी उतरायचं नसतं, असं फडणवीस म्हणाले. पण, एखादी बहिण चिडली असेल तर आम्ही तिची समजून घेऊ, कोणी जाणूनबुजून पाठवले असेल तर तेही पाहू, यामागे काही वेगळं असेल तर तेही समजून घेऊ, असं फडणवीस म्हणाले.
🕝 2.15pm | 27-9-2024📍Shirdi, Ahmednagar.
LIVE | Media interaction#Maharashtra #Shirdi #Ahmednagar https://t.co/iKhd3KOfNu
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 27, 2024