Devendra Fadnvis on Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) कुठेही गेले तरी गर्दी असते, पण शरद पवारांचं(Sharad Pawar) भाषण केरळमध्ये ठेवलं तर कोण येणार, असा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis)) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)) यांना लगावला आहे. पुण्यात आज कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
Ghati Hospital Death : धक्कादायक! नांदेडपाठोपाठ ‘घाटी’ रुग्णालयात 24 तासांत 10 मृत्यू
देवेंद्र फडणवीस म्हणाले, इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते निवडणुकीआधी आणइ नंतरही एकत्र राहु शकत नाहीत. त्यांच्यात एकही राष्ट्रीय नेता नसून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठेही गेले तरीह गर्दीच दिसते, पण शरद पवार साहेबांचं भाषण केरळमध्ये ठेवलं तर कोण येणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
‘आदित्य ठाकरेंना संजय राऊत चावलायं म्हणूनच..,’; संजय शिरसाटांनी दोघांनाही घेरलं
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवरही हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, विरोधकांचा एकच संकल्प, तो म्हणजे मोदीजींचा विरोध करणे. त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाही. आपलं दुकान बंद होईल म्हणून हे एकत्र आले आहे. हे समोर आहेत, पण यांच्या पाठीशी एक शक्ती आहे, ज्या शक्तीला अराजकता निर्माण करायची आहे. चीनच्या पैश्यांवर हे लोक अराजकता आणू पाहात आहेत. यांना चीन फंडींग करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ज्याला मच्छर आणि मुंगी चावल्यानंतर खाजवायला दुसऱ्याची नखे…; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
मविआचं सरकार आलं अन् मराठा आरक्षण गेलं :
आपण दिलं आणि टिकवलं. जोपर्यंत आमचं सरकार होत तो पर्यंत सुप्रीम कोर्टात स्थगिती आली नाही. पण मविआच सरकार आले आणि आरक्षण गेले. ज्यांनी घालवले तेच आता तोंड वर करून आरक्षण मागत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात सध्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने राज्यात एकीकडे भाजप-शिंदे गट तर दुसरीकडे महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकणार आहेत. तर इंडिया आघाडीत सामिल न झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे.