Download App

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फडणवीसांची जोरदार बॅटिंग; विरोधकांची घेतली शिकवणी

Dcm Devendra Fadnvis : अधिवेशनात विरोधकांसाठी पान सुपारी ठेवली तरच ते येणार असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnvis) यांनी केली आहे. दरम्यान, उद्यापासून विधीमंडळाच हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनातील चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं पत्र विरोधकांकडून देण्यात आलं आहे. त्यानंतर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फडणवीसांनी जोरदार बॅटिंग केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांची शिकवणीच घेतली आहे.

Chhagan Bhujbal : ..तर मराठा शिल्लक राहणार नाही, सगळेच कुणबी होतील; भुजबळांनी कारणही सांगितलं

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अधिवेशनादरम्यान चहापानाचा कार्यक्रम हा चर्चेसाठी असतो. विरोधकांचा स्वभाव पाहता पुढील वेळी पान सुपारी ठेवावी लागेल म्हणजे ते येतील, अशी शक्यता असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Horoscope Today : आज ‘वृश्चिक’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

आज विरोधी पक्षाने चहापानाला न येण्याची कारणे पत्रात दिली आहे. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत काही लोकं झोपले होते, तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही झोपले होते. तशाच झोपेत विरोधकांनी पत्र लिहिलं आहे का? असा प्रश्न पडावा असं पत्र दिलं असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

कमलनाथ यांचे दोन हट्ट पुरविणे अंगलट! ‘इंडिया’ आघाडीला सुरुंग, काँग्रेसचेही वजन घटले!

तसेच नागपूरचं अधिवेशन विदर्भ, मराठवाडा प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन असतं, पण विरोधकांच्या पत्रात मराठ्यावाड्यांचा प्रश्नांचा उल्लेखच नाही त्यांना विसर पडलेला आहे असं पत्रावरुन दिसत आहे. राज्यात काय चाललंय याचं भानही त्यांना नाही . त्यांनी कंत्राटी भरतीच्या जीआरचा विषय काढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सहीने निघालेला जीआर एकनाथ शिंदेंनी रद्द केला हे देखील विरोधी पक्षाला माहित नाही त्यांची अवस्था आपण बघितली पाहिजे, अशी खरमरीत टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होणार असल्याचं पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण राज्यात सध्या सुरु असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन यंदाचं अधिवेशन गाजणार असल्याचंही बोललं जातं आहे. त्यामुळे आता अधिवेशनात नक्की काय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार.

Tags

follow us