Devendra Fadnvis On Udhav Thackeay : देशातील पाच राज्यांच्या निवडणुका नूकत्याच पार पडल्या. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर पराभवाचं खापर फोडण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पेटलं आहे. अशातच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) लोकसभा ईव्हीएमवर घ्या म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना(Udhav Thackeray) चांगलच सुनावलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ईव्हीएममुळे जिंकले असं विरोधक आता म्हणत आहेत. तसेच दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत होतंय, असं म्हणत विरोधकांनी पराभवाचं समाधान करुन घेतलं आहे. आगामी लोकसभेतही विरोधकांचं यापेक्षाही अधिक पानिपत होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं आहे.
कॅन्सरशी लढणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याचा चेहराही ओळखू येईना! जितेंद्र अन् सचिन पिळगावकर पोहोचले भेटीला
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशात मोदींची मोठी लाट असल्याची चर्चा आहे. जर देशात मोदीलाट आहे तर मग तुम्ही लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असं खुलं चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. तसेच भाजपच्या विजयावरही उद्धव ठाकरे यांनी शंका उपस्थित केली आहे. आधी मुंबई महापालिका निवडणुका घ्या, एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Khushi Kapoor चा आई श्रीदेवीला अनोखा ट्रीब्युट; अर्चिजच्या प्रीमिअरला परिधान केला ‘तो’ ड्रेस
देशातील पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसशासित छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवला आहे.
Mumbai : अजितदादांचा आयुक्तांना फोन, अधिकाऱ्यांना खडसावलं; नेमकं काय घडलं?
मध्य प्रदेशचा बालेकिल्ला जिंकून देशात मोदीलाट असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या एकजूटीवर अनेक राज्यांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच आता काही महाराष्ट्रात काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुका बॅलेटवर घ्या, या मागणीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. देवेद्र फडणवीस यांच्या खोचक प्रत्युत्तरानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.