Download App

स्वत:ला 10 अन् पक्षाला 14 तास द्या; देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

राज्यात सध्या आगामी निवडणुकीचे वारे वाहु लागल्याची परिस्थिती दिसून येत आहे. राज्यात भाजप-शिवसेना तर समोर महाविकास आघाडीचे घटक पक्ष उभे ठाकले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती आखण्यात येत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी भाजपच्या विस्तारकांचे कान फुंकले आहेत.

हवेतच विमानाचा स्फोट! भारतीय उद्योजकासह सहा जणांचा मृत्यू

तुम्ही स्वत:ला 10 आणि पक्षाला 14 तास द्या, असा कानमंत्रच देवेंद्र फडणीसांनी(Devendra Fadnvis) विस्तारकांनी दिला आहे. विस्तारकांनी मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) बोलत होते.

Kasturi: ठरलं! सफाई कामगाराची कथा सांगणारा ‘कस्तुरी’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) म्हणाले, देशात आणि राज्यात भाजप नेहमीच बॉस राहिला आहे. भाजपसाठी विस्तारकांनी अधिकाधिक वेळ देणं गरजेचं आहे. सर्वच विस्तारकांनी स्वत:साठी 10 आणि पक्षासाठी 14 तास द्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

वॉर्नर म्युझिकचे ‘कमिंग होम’ अॅंथमने अमेरिकेत रचला इतिहास, 1 दशलक्ष लोकांच्या उपस्थित लॉंचिंग सोहळा…

तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींना सातत्याने संपर्क करा, आगामी काळात एक वर्षांसाठीचा रोडमॅप विस्तारकांनी तयार करावा, अशा सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

Asian Games 2023 : अदितीने रचला इतिहास! ‘गोल्फ’मध्ये पदक जिंकणारी पहिलीच भारतीय

राज्यात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे, तरीही राज्यात ‘भाजप ईज ऑल्वेज बॉस’ असून युतीतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधून त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी विस्तारकांसह सर्वांवर असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

‘किस्से वर्ल्डकप’चे वर्ष 1983! सेलिब्रेशनसाठी उधारीची शॅम्पेन अन् उपाशी खेळाडू…

विस्तारकांनी आधी पक्ष आणि मी शेवटी हेच धोरण हवं, इथं मी उभा पक्षामुळेच असल्याचं फडणवीस(Devendra Fadnvis) म्हणाले आहेत. तसेच मी पक्ष सोडून उभा राहिलो, तर माझेही डिपॉझिट जप्त होईल, असं सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम विस्तारकांना करायचं असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यात एक वर्षांपूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करुन भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं. हाच संघर्ष अद्यापही सुरुच असताना आता राष्ट्रवादीत अजित पवार यांनीही आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत.

Tags

follow us