हवेतच विमानाचा स्फोट! भारतीय उद्योजकासह सहा जणांचा मृत्यू

  • Written By: Published:
हवेतच विमानाचा स्फोट! भारतीय उद्योजकासह सहा जणांचा मृत्यू

Harpal Randhawa Dies in Zimbabwe plane crash: झिम्बाब्वेमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. यात भारतीय उद्योगपती हरपाल रंधवा (Harpal Randhawa) यांच्यासह मुलगा व इतर चार अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हरपाल रंधवा यांनी झिम्बाब्वेमध्ये खाणी विकत घेतलेल्या आहेत. त्यात सोने, हिरे आणि कोळशाच्या खाणी आहेत. एका हिऱ्याच्या खाणीकडे जात असलेल्या या छोट्या विमानाचा अपघात झाला आहे.


Dhananjay Munde : संजय राऊत करमणुकीचं साधन, आम्हाला कंटाळा आलाय; मंत्री मुंडेंचा टोला

या विमानाने 29 सप्टेंबर रोजी राजधानी हरारे येथून झिम्बाब्वेच्या नैऋत्य भागातील मुरोवा हिऱ्याच्या खाणीकडे उड्डाण केले होते. त्याचवेळी विमानामध्ये तांत्रिक बिघाड होऊन हे विमान कोसळले असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. हे विमान रिओझिमच्या मालकीचे होते. या अपघातात विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रंधावा पिता-पुत्रांसह दोन परदेशी नागरिक होते. तर दोन झिम्बाब्वेच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Kiran Mane: किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या आठवणीत भावुक पोस्ट; म्हणाले, अजूनबी विश्वास..

29 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पांढऱ्या आणि लाल रंगाचे Zcam विमान म्हणून ओळखले जाणारे विमान हरारे येथून सकाळी 6 वाजता निघाले होते. या विमानाचा हवेमध्ये स्फोट झाला आहे. मशावापासून सहा किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले. त्यात सर्वांचा मृत्यू झाला आहे. रंधावा यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इतर मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. अपघाताबाबतची अतिरिक्त माहिती जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाचे प्रवक्ते पॉल न्याथी यांनी दिली आहे.

दरम्यान रंधावा यांचे मित्र व चित्रपटाचे दिग्दर्शक होपवेल चिनोनो यांनी एक्सवरही ही माहिती दिली. माझा मित्र रंधावा हे आता जगात राहिलेले नाहीत.विमान अपघातात त्यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

इक्विटी फर्म जेम होल्डिंगचे संस्थापक
हरपाल रंधावा हे चार अब्ज डॉलरच्या इक्विटी फर्म जेम होल्डिंगचे संस्थापक आहेत. हरपाल रंधावा हे RioZim खाण कंपनीचे मालक होते. सोने, हिरे या धातुबरोबर निकेल, तांबे या धातुंच्या शुध्दिकरणाचे कामही ही कंपनी करतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube