पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी, शिंदेंनी केली ती बेईमानी कशी, फडणवीसांचा सवाल

सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 1978 च्या पुलोद सरकार वरून पवारांवर निशाणा साधला होता. फडणवीस म्हणाले होते की ‘1978 पवारांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी तेच शिंदेंनी केलं तर गद्दारी असं कसं चालेलं’. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की ‘मी कधी […]

Letsupp Image   2023 06 26T112609.865

Devendra Fadanvis Sharad pawar

सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 1978 च्या पुलोद सरकार वरून पवारांवर निशाणा साधला होता. फडणवीस म्हणाले होते की ‘1978 पवारांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी तेच शिंदेंनी केलं तर गद्दारी असं कसं चालेलं’. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की ‘मी कधी मुत्सद्देगिरी केली ते त्यांनी सांगावं. 1978 ला आम्ही सरकार बनवलं त्यावेळी भाजप आमच्यासोबत होती. त्यावेळी फडणवीस लहान असतील त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहित नसेल.'(Devend Fadnavis criticizes Sharad Pawar and NCP)

यावर बोलताना फडणवीस म्हणतात… मी जे बोललो ते एकतर पवारांनी एकल नाही आणि एकल असेल तर ते त्यांना अस्वस्थ करणार होत. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रेयत्न केला. 1978 साली पवारांनी वसंतदादा सोबत मंत्री सटाणा काँग्रेस पक्ष फोडला आणि भाजपसोबत सरकार बनून मुख्यमंत्री झाले. मग पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी, शिंदेंनी केली ती बेईमानी कशी असा सवाल यावेळी फडणवीसांनी केला.

फडणवीस-ठाकरे पुन्हा भिडणार? शाखा पाडल्याच्या राड्यावरुन दोन्ही नेते आमने-सामने

मी प्राथमिक शाळेत होतो की माझा जन्म झालेला नव्हता यामुळे काही इतिहास बदलत नाही. इतिहास हा आहे की 1978 ला शरद पवरांनी वसंतदादांचं सरकार पाडलं. त्यांनी 40 आमदार फोडले ते भाजपसोबत गेले आणि सरकार बनवलं.

पुढे OBC वरून फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दाखवण्यापुरतं OBC लागत. प्रमुख संविधानिक पदआली की त्यांना OBC चा विसर पडतो असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला. त्यांच्या पक्षातील नेतेच म्हणतात OBC चा अध्यक्ष करा त्यांच्या पक्षातील नेते जे हळू बोलतात तेच मी मोठया आवाजात बोलतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाच्या दबावात चालतो हे मी सांगण्याची गरज नाही अशी टीका यावेळी फडणवीसांनी केली.

Exit mobile version